Mapusa Market Dainik Gomantak
गोवा

Mapusa Market: म्हापसा सबयार्ड दुर्लक्षित, सुविधांचा अभाव!

Mapusa Market: इमारतीची अवस्था बिकट योग्य प्रवेश रस्ता नसल्याने व्यापाऱ्यांची कुचंबणा

दैनिक गोमन्तक

Mapusa Market: उत्तर गोव्यातील मोठी बाजारपेठांपैकी एक असलेले म्हापसा सबयार्ड मार्केट सध्या दुर्लक्षित बनले आहे. सुमारे चार दशकांच्या कालावधीत हे मार्केट अनेक पटींनी वाढले मात्र त्यानुसार पायाभूत सुविधांत वाढ झाली नाही.

म्हापसा सबयार्ड मार्केट हे उत्तर गोव्यातील प्रमुख सबयार्ड असून अंदाजे २१ हजार चौरस मीटर जागेवर वसले आहे. येथे भाजीपाला, फळे, नारळ व इतर कृषी आधारित उत्पादनांचे १०० पेक्षा जास्त व्यापारी हे घाऊक, किरकोळ व्यवसाय करतात. या व्यापाऱ्यांसोबतच विक्रेतेही व्यवसाय करतात.

म्हापसा यार्ड इमारतीची पायाभरणी २६ मार्च १९८२ रोजी करण्यात आली आणि ६ जून १९८४ रोजी ती लोकांसाठी खुली झाली. मात्र योग्य देखभाल व डागडुजी न केल्यामुळे इमारतीची अवस्था बिकट झाली. मध्यंतरी येथील व्यापाऱ्यांनी आवाज उठवला होता.

या सबयार्ड मार्केटची प्रमुख समस्या या मार्केटला जोडणारा योग्य प्रवेश रस्ता नसल्याने व्यापाऱ्यांची कुचंबणा होते. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातून या मार्केटमध्ये यावे लागते. हा प्रश्न सोडवण्यासाठी कार्व्हालो पेट्रोल पंपासमोर नवीन रस्ता तयार करण्यात आला, मात्र मुख्य रस्त्यावर दुभाजक असल्याने या नवीन रस्त्याचा पुरेपूर वापर होत नाही.

याशिवाय आणखी एक समस्या म्हणजे व्यापाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या स्टॉल्सचा आकार खूपच लहान आहे. तसेच या इमारतीत योग्य हवाही खेळत नाही. कचरा व्यवस्थापनाचा प्रश्नही चिंतेचा विषय आहे. म्हापसा सबयार्ड समितीने विविध उपाययोजना केल्या असल्या तरी कचरा अजूनही मोठा अडथळा आहे.

सविस्तर प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्राकडे

गोवा कृषी पणन मंडळाने म्हापसा सबयार्ड बाजारपेठ विकसित करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रस्तावित डीपीआरमध्ये मंडळाने सध्याच्या स्टॉलच्या तुलनेत मोठ्या आकाराची सुमारे १०० दुकाने प्रस्तावित केली आहेत. याशिवाय कचरा प्रकल्प, राईपनिंग चेंबर्स, शौचालय ब्लॉक्स, कोल्ड स्टोअरेज व इतर सुविधांची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

Railway Accident: पत्नी दारूच्या नशेत रेल्वे ट्रकवर बसली, वाचवायला गेलेल्या पतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; वेरोड्यातील दुर्घटना

Sal: भेडशीत तिळारी, दोडामार्गात मणेरी नावाने ओळखली जाणारी गोव्यातील शापुरा नदी; सौंदर्यसंपन्न बनलेला 'साळ गाव'

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

हणजूण येथे पर्यटकांच्या वाहनाची ट्रान्सफॉर्मरला धडक; दारूच्या बाटल्या सापडल्याने संशयाचे वातावरण!

SCROLL FOR NEXT