Sewerage Chambers Overflow  Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: म्हापशात चेंबरचे पाणी रस्त्यावर; प्रवाशांना मनःस्ताप

Sewerage Chambers Overflow: रस्त्यावर दुर्गंधी पसरली असून पादचाऱ्यांना पाणी चुकवत चालताना त्रास सोसावा लागत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: येथील शहरातील मलनिस्सारण प्रकल्पाचे काम अद्याप पूर्ण झाले नसले, तरी हा प्रकल्प लोकांसाठी सध्या डोकेदुखी ठरत आहे. कारण अनेक ठिकाणी सिवरेज चेंबर्स हे ओसंडून वाहत असल्याने प्रवाशांना मनःस्ताप सहन करावा लागतोय. चेंबर्समधून सतत पाणी वाहत असल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरली असून पादचाऱ्यांनाही ते पाणी चुकवत चालताना त्रास सोसावा लागत आहे.

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, चेंबर्स ‘ओव्हरफ्लो’ झाल्याची तक्रार अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र प्रश्न उपस्थित करूनही दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

स्थानिकांनी सांगितले की, म्हापसा येथील मलनिस्सारण प्रकल्पाचा एक भाग म्हणून भूमिगत चेंबर्स बांधण्यात आले होते. परंतु चेंबर्समधील गळतीमुळे चेंबर्समधून पाणी ओसंडून वाहत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले.

सांडपाण्याचे चेंबर्स ओसंडून वाहत असल्याने रस्त्यावर पाणी साचले आहे. विशेषतः सीम-खोर्ली म्हापसा पोलिस स्थानकामागील, कारसवाडा, गावसावाडा येथील चेंबर्स मोठ्या चिंतेचे कारण बनले आहे.

कामरखाजन प्रकल्पाचे काम रखडले!

नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर यांनी सांगितले की, म्हापसा शहरातील ओसंडून वाहत असलेल्या सांडपाण्याच्या चेंबर्सची गळती दूर करण्यासाठी आम्ही ‘साबांखा’ला याआधीच पत्र पाठवले आहे. सरकारने फेब्रुवारी २०१३ मध्ये, ८० कोटी रुपये खर्चाच्या या मलनिस्सारण प्रकल्पाची पायाभरणी केली होती. त्यानंतर लगेचच काम हाती घेण्यात आले होते. या प्रकल्पासाठी शहरातील १५ प्रभागांमधून ३०किमी अंतरावर वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. कामरखाजन येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण व्हायचा होता, मात्र अद्यापही या प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT