Ration Shop   Gomantak Digital Team
गोवा

Goa Ration Controversy: रेशन दुकानांमध्‍ये मिळतोय ओला तांदूळ; तीव्र संताप

यापूर्वी रेशनदुकानांतून सडका तांदूळ देण्‍याचे प्रकरण राज्‍यात बरेच गाजले

गोमन्तक डिजिटल टीम

Ration Shop News : म्हापसा शहरातील रेशन दुकानांमध्ये आता ओला तांदूळ मिळत असल्‍याने ग्राहकांनी संताप व्‍यक्त केला आहे. यामध्ये दुकानदारांचा दोष नाही तर ज्‍या गोदामांमध्‍ये तांदूळ ठेवला जातो तेथे तो भिजतो. तसाच तो विक्रीसाठी पाठवला जातो. याबाबत एका ग्राहक दीपक रेडकर यांनी सांगितले की, मी रेशनदुकानावरून आणलेला तांदूळ ओला निघाला. हा तांदूळ पूर्णपणे खराब झाला असून तो खाण्याच्‍याही लायकीचा राहिला नाही. त्‍यामुळे तो फेकून द्यावा लागला.

पुढे माहिती देताना रेडकर यांनी सांगितले की, ज्या गोदामात हा तांदूळ ठेवला जातो, तेथेच तो भिजतो. त्‍यानंतर स्‍वस्‍त धान्‍य दुकानांना त्‍याची तशीच विक्री केली जाते. दुकानदारांचाही नाईलाज असतो, ते तशीच विक्री करतात. त्‍याचा फटका ग्राहकांना बसतो.

दरम्‍यान, यापूर्वी रेशनदुकानांतून सडका तांदूळ देण्‍याचे प्रकरण राज्‍यात बरेच गाजले होते. आता ओला तांदूळ वितरित होत असल्‍याने ग्राहकांनी संताप व्‍यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT