Mapusa Police Arrested One Person  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Police : अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 26 वर्षीय युवकास अटक

म्हापसा पोलिसांची कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा पोलिसांनी अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एका 26 वर्षीय युवकाला अटक केली आहे. संशयिताकडून 800 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून म्हापसा पोलिस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी म्हापसा नवीन बस स्टॅन्डच्या पाठीमागील बाजूला पोलिसांनी छापा टाकला. यावेळी संशयित शमशु खान (26) याची तपासणी केली असता संशयिताकडे 80 हजार रुपये किंमतीचा गांजा सापडला. संशयित हा इंदिरानगर, चिंबेलचा रहिवासी आहे.

संशयितावर म्हापसा पोलीस स्थानकात एनडीपीसी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक रिचा भोंसुले, हेड कॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर, कॉन्स्टेबल प्रकाश पोळेकर, विनय हिरोजी, अक्षय पाटील, राजेश कांदोळकर, तुकाराम कांबळी व आनंद राठोड या पथकाने ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

Goa Drug Racket: आशा, रोविनानंतर आता पोक्सो कैदी योगेश मांद्रेकरही अटकेत; कोलवाळ जेल ड्रग्स प्रकरणात तिसरी कारवाई

Goa Municipal Elections: विधानसभेपूर्वीच पालिका निवडणुका! 11 नगरपालिकांसाठी कोर्टाचा मोठा आदेश, 4 जानेवारीपर्यंत निकाल

Operation Sindoor: ''शेवटचा वार भारताचाच असणार होता''!, 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माजी CDS अनिल चौहान यांचा धक्कादायक खुलासा; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची दैना VIDEO

Horoscope 26 August 2026: बुधवार 'या' राशींसाठी ठरणार वरदान! करिअरमध्ये मिळणार गरुडभरारीची संधी; उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार

SCROLL FOR NEXT