BIke Rider Arrested For Stunts Dainik Gomantak
गोवा

Mapusa Bike Stunt: स्टंटबाजी पडली महागात! म्हापशात पिता-पुत्राला अटक

बाईक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

दैनिक गोमन्तक

BIke Rider Arrested For Stunts: एकीकडे राज्यातील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी वाहतूक पोलीस सतर्क राहून वाहनचालकांना नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन करत आहेत; तर दुसरीकडे काहीजण हेच नियम धाब्यावर बसवत आहेत. अशीच एक घटना म्हापसामध्ये घडली असून, बाईकवरून स्टंट करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

माहितीनुसार, एक तरुण धोकादायक बाईक स्टंट करताना दिसत असल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. म्हापसा पोलिसांनी रविवारी (ता.16) या स्टंट करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला. ज्यामध्ये एक मुलगा हेल्मेटशिवाय बाइक स्टंट करताना दिसत आहे.

यसिन मुल्ला (20, डांगी कॉलनी, म्हापसा) असे अटक केलेल्या या संशयित चालकाचे नाव आहे. तसेच अब्दुल मुल्ला याला देखील अटक केली. हे दोघेही पिता-पुत्र आहेत.

म्हापसा पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना दि. 7 नोव्हेंबर 2022 म्हापसा कोर्ट जंक्शनवरील रस्त्यावर घडली. यापूर्वी मे 2023मध्ये यसिनवर अशाचप्रकारे स्टंटबाजी करताना गुन्हा नोंदवून त्याला अटक झालेली.

या स्टंटबाजी करताना वापरलेली गाडी (जीए 03 एक्यू 7945) पोलिसांनी जप्त केली आहे. सदर गाडी अब्दुल मुल्ला यांच्या नावावर असल्याने पोलिसांनी या पिता-पुत्रास अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी 279, 336 तसेच मोटर वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला व अटक केली. म्हापसा पोलीस पुढील तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: रिझवानची लाजच काढली! नॉट आऊट असूनही मैदानाबाहेर जावं लागलं! व्हिडिओ व्हायरल

Viral Video: बड्या नेत्याचा साधेपणा की राजकीय स्टंट? खासदारसाहेब बनले 'डिलिव्हरी बॉय', ब्लिंकिटचा युनिफॉर्म घालून घरोघरी पोहोचवलं पार्सल

शेतीची जमीन अन् क्लबचा धंदा; हणजूण येथील 'त्या' क्लबला प्रशासनाचा दणका, ठोठावला 15 लाखांचा दंड

Goa Winter Session: विधानसभेत एक मिनिटाचे मौन! शिरगाव आणि हडफडे दुर्गटनेतील मृतांना वाहिली श्रद्धांजली

Goa Crime: मुंगुल गँग वॉरचा आरोपी आता 'पोक्सो'च्या कचाट्यात! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी कुख्यात अमर कुलालच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT