Goa Government Job Scam
Goa Government Job Scam  Dainik Gomantak
गोवा

Goa Job Scam: गोव्यात परदेशात नोकरीचे आश्वासन देऊन फसवणूकीचे सत्र सुरुच...

दैनिक गोमन्तक

म्हापसा पोलिसांनी आर्थर केनेडी लॉरेन्को (45) या व्यक्तीला परदेशात नोकरीचे आश्वासन देऊन, पैसे गोळा करून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे; आरोपींनी विविध परदेशी देशांमध्ये नोकरीच्या ऑफरच्या संदर्भात प्रिंट मीडियावर जाहिराती पोस्ट केल्या होत्या; दरम्यान आरोपींनी विविध व्यवहारातून रु. 4.40 लाखाचा व्यवहार केल्याचे प्राथमिक तपासातुन समोर आले आहे. याबाबत पुढील तपास सुरु आहे.

(Job Scam In Goa)

परदेशात नोकऱ्यांच्या आमिषाला बळी पडलेल्या गोमंतकीयांची मानवी तस्करीसह फसवणूक होत आहे. यामुळे अवैध दलालांच्या आस्थापनांविरोधात कठोर कारवाई व परदेशातील नोकऱ्यांसंदर्भात जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या संबंधित दलाल, आस्थापनांची पडताळणी करावी, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिसांना सांगितले. याविरोधात तक्रारी येण्याची वाट न पाहण्याच्या कानपिचक्या मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिल्या. त्यामुळे हे दलाल आता पोलिसांच्या रडारवर येणार आहेत. 

परदेशात नोकऱ्या देणारे पोलिसांच्या रडारवर

पणजीत गोवा पोलिस खात्यातर्फे मानवी तस्करी विरोधी राज्यस्तरीय एकदिवशीय परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले की, गुन्हेगारी संघटीत मानवी तस्करीविरोधात लढा देण्यासाठी पोलिस, एनजीओ, न्यायसंस्था एकत्रितपणे येऊन काम करण्याची गरज आहे. तस्करीमधील दलालांविरुद्ध कडक कारवाई झाल्यासच या कारवायांना आळा बसू शकतो. केंद्र सरकारने ही समस्या गांभिर्याने घेतली आहे.

गोव्यात आदरातिथ्य, कृषी व आयटी क्षेत्रात पुढील 5 वर्षात सुमारे 2 लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. 10 व 12 वी उत्तीर्ण युवकांनी मोठ्या नोकऱ्यांची अपेक्षा न बाळगता लहान नोकरीपासून सुरवात करत उच्च पदापर्यंत कार्यक्षमतेच्या आधारावर जावे, असं आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

Catholic Wedding: कॅथलिक समाजासाठी विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी; चर्चिल आलेमाव यांची मागणी

Kerala West Nile Virus: केरळला वेस्ट नाईल व्हायरसचा धोका; जाणून घ्या किती धोकादायक आहे हा आजार!

Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

कोर्टात 13 महिन्यांच्या बाळाला तिने फरशीवर फेकले, न्यायाधीशही चकित झाले; वाचा नेमकं प्रकरणं

SCROLL FOR NEXT