murder attempt Dainik Gomantak
गोवा

Mapusa Police: खुनी हल्ला करणाऱ्या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

म्हापसा बस स्टँड परिसरात घडला प्रकार

दैनिक गोमन्तक

चंद्रकांत शिरोडकर यांच्यावर आज दिनांक 28 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता म्हापसा बस स्टँडकडे जात असताना खुनी हल्ला केला आहे. दोघा दुचाकीस्वारांनी पाठलाग करत हल्ला केला असल्याची तक्रार म्हापसा पोलिसात दाखल झाली आहे.

(Mapusa Police 2 arrested for attempt to murder )

मिळाल्या माहितीनुसार कांदोळी येथील चंद्रकांत शिरोडकर हे आज दुपारी 4 वाजता म्हापसा येथील कदंबा बस स्टॅन्डकडे जात होते. यावेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चंद्रकांत शिरोडकर यांना रोखले आणि त्यांच्यावर चाकू हल्ला केला. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे, अशी तक्रार ब्रिजेश शिरोडकर रा. कांदोळी यांनी म्हापसा पोलिसात दिले आहे.

दाखल झालेल्या तक्रारीनुसार म्हापसा पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत धमकी देत खुनी हल्ला करणाऱ्या दोघांचा शोध सुरु केला. याला काही तासातच यश मिळाल्याने म्हापसा पोलिसांनी दोघा संशयितांना या प्रकरणात अटक केली आहे. समीर पेडणेकर आणि सुरेश कुंभार अशी या दोन संशयितांची नावे आहेत.

समीर पेडणेकर आणि सुरेश कुंभार हे संशयित खोर्ली, बार्देश येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. संशयितांवर पोलिसांनी कलम 341, 504, 307, 506(ii) अंतर्गत गुन्हे दाखल केले असून, आरोपींनी नेमका कोणत्या कारणावरुन हा हल्ला केला याचा तपास पोलिस घेत आहेत. अशी माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT