Sattari परिसरात एकावर अस्वलाचा हल्ला; नागरिकांमध्ये घबराट

प्रशासनाने यातून मार्ग काढावा
Bear attack
Bear attackDainik Gomantak
Published on
Updated on

झाडांनी-सत्तरी येथे शंकर गावकर या शेतकऱ्यावर एका अस्वलाने (Bear) हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.गावकर हे आपल्या घरापासुन काही अंतरावर असताना हा हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी 28 ऑक्टोबर रोजी रात्री उशीरा घडली आहे.

(Bear attack on Shankar Gaonkar at kadwal Sattari )

Bear attack
Velsao: वेळसाव रेल्वे दुपदरीकरणास स्थानिकांचा विरोध कायम

मिळालेल्या माहितीनुसार शंकर गावकर या शेतकऱ्यावर कर्नाटक आणि गोवा राज्याच्या सिमेवर असणाऱ्या झाडांनी, सत्तरी या गावात राहत्या घराशेजारीच एका अस्वलाने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यादरम्यान अस्वलाने शेतकऱ्याच्या पायाचा चावा घेतल्याने त्याला मोठी जखम झाली आहे. हल्ल्यानंतर रात्री उशीरा गावकर यांना वाळपई शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. त्यानतर बांबोळी येथील वैद्यकीय इस्पितळात पाठविण्यात आले आहे.

Bear attack
Goa Mining: मायनिंग ब्लॉक्सच्या लिलावात कमालीची गुप्तता; चार ब्लॉक्ससाठी 24 कंपन्या शर्यतीत?

नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

झाडांनी हा गाव घनदाट जंगलात येत असल्याने या ठिकाणी जंगली प्राण्याचा वावर कायम असतो. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरुन प्रवास करताना अस्वल हल्ला करणार का? हा प्रश्न कायम सतावत असल्याचं म्हटलं आहे. तसेच अस्वलांचा वावर वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावारण पसरले आहे. वेळीच प्रशासनाने यातून मार्ग काढावा अशी मागणी स्थानिकातून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com