Mapusa Hotel Fight Dainik Gomantak
गोवा

Mapusa Hotel Fight: हॉटेल बिलाच्या वादातून बाप-लेकाला बेदम मारहाण, फास्ट फूड सेंटर बनले आखाडा; म्हापसा पोलिसांत गुन्हा दाखल

Mapusa Bill Dispute Violence: म्हापसा येथील अलंकार थिएटरनजीक असलेल्या ‘पापा फास्ट फूड’ नामक सेंटरमध्ये जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना घडली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: येथील अलंकार थिएटरनजीक असलेल्या ‘पापा फास्ट फूड’ नामक सेंटरमध्ये जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलमालक आणि कर्मचाऱ्यांनी मिळून केलेल्या या मारहाणीत एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला आठ टाके पडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्साभाट - म्हापसा (Mapusa) येथील रहिवासी राजन वामन हळदणकर यांनी याप्रकरणी म्हापसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ६ मे रोजी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास राजन हळदणकर आणि त्यांचा २९ वर्षीय मुलगा राहुल हे ‘पापा फास्ट फूड’ नामक सेंटरवर जेवायला गेले होते. जेवण झाल्यानंतर बिलाच्या पैशांवरून हॉटेल व्यवस्थापनाशी त्यांचा किरकोळ वाद झाला.

मात्र, या वादाचे पर्यावसान अचानक हिंसक हाणामारीत झाले. संशयित आनंद हजारे, श्रीधर हजारे (दोघे राहणार म्हापसा), रोहित रवी रॉय (रा. धुळेर) आणि हॉटेलच्या इतर अज्ञात कर्मचाऱ्यांनी हळदणकर पिता-पुत्राला घेरले. यावेळी त्यांना हॉटेलमधील जड धातूच्या भांड्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात राहुल हळदणकर यांच्या डोक्याला खोलवर जखम झाली, तर राजन हळदणकर यांनाही शारीरिक दुखापत झाली आहे. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून सर्व संशयितांना नोटीस जारी केली आहे.

भांड्यांनी दिला चोप

यावेळी संशयितांनी हॉटेलमधील जड धातूच्या भांड्यांनी मारहाण केल्यामुळे राहुल हळदणकर यांच्या डोक्याला इजा झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT