Mapusa: नातेवाईकांचे गंभीर आरोप; मात्र, पोलिसांत तक्रार नाही, हॉटेल व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू

Ashfaq Khan Saligao death: स्वतःला पेटवून घेतल्याने गंभीर जखमी झालेले हॉटेल व्यावसायिक अश्पाक खान (वय ५० वर्षे) यांचा उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री गोमेकॉत मृत्यू झाला.
Ashfaq Khan Saligao death
Ashfaq Khan Saligao deathDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: मुड्डोवाडा-साळगाव येथे स्वतःला पेटवून घेतल्याने गंभीर जखमी झालेले हॉटेल व्यावसायिक अश्पाक खान (वय ५० वर्षे) यांचा उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री गोमेकॉत मृत्यू झाला. हा आत्महत्येचा प्रयत्न नसून घातपात असावा, असा संशय माध्यमांसमोर व्यक्त करत अश्पाक यांचे बंधू मुख्तार खान यांनी अश्‍पाक यांचा व्यावसायिक भागीदार रवी नामक व्यक्तीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविली नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

मूळचे विदर्भ (महाराष्ट्र) येथील अश्पाक खान सध्या कळंगुट येथे स्थायिक होते. त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा परिसरात असली, तरी त्यांच्या कुटुंबीयांनी हॉटेल व्यावसायिक भागीदार रवी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अश्पाक यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शनिवारी त्यांचे कुटुंबीय आपल्या मूळ गावी रवाना झाले. मात्र, या प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झाली नसल्याचे साळगाव पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Ashfaq Khan Saligao death
Goa Weather: गोव्यात उन्हाचा तडाखा वाढला! पारा 34 अंशांवर, घामाच्या धारांनी गोवेकर हैराण

मामला ६ कोटी रुपयांचा

मिळालेल्या माहितीनुसार, अश्पाक खान आणि रवी यांनी भागीदारीत हॉटेल व्यवसाय सुरू होता. रवी हे केंद्रीय कर्मचारी असून व्यवसायातील सर्व आर्थिक व्यवहार तेच सांभाळत होते. अश्पाक यांनी वारंवार मागणी करूनही रवी पैसे परत करत नसल्याचे त्यांनी कुटुंबीयांना सांगितले होते. हा व्यवहार सुमारे ६ कोटी रुपयांचा असल्याने या प्रकरणाची सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी मुख्तार खान यांनी केली आहे.

Ashfaq Khan Saligao death
Goa Politics: आपल्याकडून विश्वासघात होणार नाही! काँग्रेस प्रवेशावेळी अमित पालेकरांनी नेत्यांना दिली ग्वाही

पेटवून घेतले, की पेटविले : संशय

ही दुर्घटना शुक्रवारी (ता. १०) रवी राहात असलेल्या इमारतीमध्ये घडली होती. त्यामुळे अश्पाक यांनी स्वतःला पेटवून घेतले, की त्यांना पेटविण्यात आले, याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे खान यांनी नमूद केले. मात्र, इतके गंभीर आरोप करूनही नातेवाईकांनी अद्याप साळगाव पोलिसांकडे कोणतीही लेखी किंवा तोंडी तक्रार केलेली नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com