Mapusa News Dainik Gomantak
गोवा

Mapusa News : संरक्षक भिंत कोसळली; तीन वाहनांचा चुराडा

एकता नगर - म्हापसा येथील घटना : तिन्ही गाड्यांचे मिळून आठ लाखांचे नुकसान

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा : संततधार पडणाऱ्या पावसामुळे एकतानगर - म्हापसा येथील एका घराची संरक्षक भिंत कोसळून तीन वाहनांचे नुकसान झाले. वाहन व संरक्षक भिंत मिळून सुमारे ८ लाख रुपये मालमत्तेची हानी झाली. हा प्रकार रविवारी (ता. २५) पहाटे उघडकीस आला. या ठिकाणी संरक्षक भिंतीच्या जवळ दोन कारगाड्या व एक दुचाकी पार्क केली होती. पावसामुळे ही जुनी भिंत खचल्याने ती या वाहनांवर कोसळली.

याबाबत माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य राबविले. यावेळी स्थानिक नगरसेवक आशीर्वाद खोर्जुवेकर यांनीही घटनास्थळी भेट दिली व पालिकेच्या कामगारांना वाहनांवर पडलेले दगड व विटा हटविण्यास सांगितले.

या कोसळलेल्या संरक्षण भिंतीखाली सापडून सुधीर पाटील यांची जीए ०६ ई ४०२१ क्रमांकाच्या कारचे १ लाख ५० हजार रु., प्रणिता नाईक यांच्या जीए ०६ एफ २०८६ क्रमांकाच्या कारगाडीचे सुमारे ६ लाख रु., तर जीए ०३ ई ६४४३ क्रमांकाची अकबर नदाप यांची मोटारसायकलचे १ लाख रुपयांचे नुकसान झाले.

दरम्यान, शनिवारी रात्री अशाचप्रकारे समतानगर, खोर्ली-म्हापसा येथे रस्ता खचल्याने येथील रस्त्याची संरक्षक भिंत झाडासह घरावर कोसळली. यात एक दुचाकी या संरक्षक भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकली, तर घराचे काही प्रमाणात नुकसान झाले.

...म्हणून अनर्थ टळला !

ही घटनेची माहिती म्हापसा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्यामुळे या वाहनांमध्ये कोणीही नव्हते, त्यामुळे जीवितहानी टळल्याचे त्यांनी सांगितले. कारण ही वाहने फक्त त्या ठिकाणी उभी करून ठेवण्यात आलेली होती. जर एखाद्यावेळी कोणी गाडीत बसलेला असता तर अनर्थ घडला असता,असेही पोलिसांनी सांगितले. ही घटना घडली तेव्हा परिसरात पहाटे मोठा आवाज झाल्याचे तेथे राहणाऱ्यांकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'सेरेंडिपिटी'त आगीच्या घटनेची पुनरावृत्ती, गेल्या वर्षीच्या 8 डिसेंबरची आठवण; कला अकादमीत सेट जळाला

Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंचा थायलंडला पळ! 'लूक लाऊट' नोटीस जारी; गोवा पोलिसांचा दिल्लीत छापा

Horoscope: धनलाभ आणि भाग्योदयाचे योग! आजच्या राशी भविष्यात तुमच्यासाठी काय आहे?

Mungul Gang War: मुंगूल गँगवॉरप्रकरणी 10 आरोपींना जामीन मिळणार की नाही? 12 डिसेंबरला कोर्टाचा फैसला; साक्षीदारांना धमकावण्याची भीती

Mungul Gang War: मूंगुल गॅंगवारप्रकरणी आरोपींच्या भवितव्याचा फैसला 12 डिसेंबरला; कोर्टाने निर्णय ठेवला राखून

SCROLL FOR NEXT