Bicholim
Bicholim Dainik Gomantak

Mobile Misuse: सावधान! मोबाईलचा विळखा वाढतोय; मुलांकडून होतोय गैरवापर

डिचोलीत ‘मुलं आणि मोबाईल’वर कार्यशाळा
Published on

Mobile Misuse मुलांकडून सध्या मोबाईलचा गैरवापर वाढला आहे. त्यामुळे सावध होऊन विद्यार्थ्यांचे अंतःकरण जाणून अगोदर त्यांच्या हृदयाला स्पर्श करा.

तरच त्यांच्या मनावर चांगले विचार आणि संस्कार रुजविणे सहज शक्य आहे,असे मत शिक्षणतज्ञ आणि गोमंतक पालक परिषदचे निमंत्रक प्रा. दिलीप बेतकीकर यांनी व्यक्त केले.

गोमंतक पालक परिषद आयोजित‘मुलं आणि मोबाईल’ या विषयावरील कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रा. बेतकीकर बोलत होते.

मोबाईल ही आजची गरज आणि मोबाईलचा विधायक कार्यासाठी वापर आवश्यक असला, तरी आजचे विद्यार्थी मोबाईलचा गैरवापर अधिक करीत आहेत. विद्यार्थी अक्षरशः मोबाईलच्या विळख्यात अडकलेले आहेत, अशी खंत प्रा. दिलीप बेतकीकर यांनी व्यक्त केली.

Bicholim
Goa Cabinet Reshuffle: मंत्रिमंडळात दोघांना घेण्याच्या हालचाली सुरू; मात्र दोघांची खुर्ची धोक्यात

डिचोली येथील केशव सेवा साधना संचलीत विशेष शाळेत शनिवारी (ता.२४) आयोजित केलेल्या या कार्यशाळेचे विशेष शाळेचे व्यवस्थापक मकरंद कामत यांनी उद्घाटन केले. यावेळी शिक्षणतज्ञ रामचंद्र गर्दे उपस्थित होते.

नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर पालकांमध्ये व्यापक जागृती करण्यासाठी गोमंतक पालक परिषद स्थापन करण्यात आली आहे. असे रामचंद्र गर्दे यांनी सांगून मुलांच्या भवितव्याचा विचार करुन पालकांनी पुढे यावे. असे आवाहन केले.

कार्यशाळेला महिला पालकांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी काही पालकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे दिलीप बेतकीकर यांनी निरसन केले. प्रा. सोमनाथ पिळगावकर यांनी सूत्रसंचालन केले.

Bicholim
Rajarshi Shahu Maharaj: जाती-धर्माच्‍या भिंती भेदण्‍यासाठी शैक्षणिक क्रांतीची गरज- मोहिते

दुष्परिणाम सांगावेत-

मोबाईलच्या दुष्परिणामांपासून मुलांची सुटका करायची असल्यास पालकांनी मुलांना अगोदर विश्वासात घेणे गरज आहे. त्यांना मोबाईलच्या दुष्परिणामांची जाणीव करून देणे आवश्यक आहे,असे प्रा. बेतकीकर म्हणाले.

यावेळी त्यांनी काही गोष्टी सांगून मुलांना मोबाईलच्या वेडातून सोडविण्यासाठी पालकांनीच जबाबदारी स्वीकारावी,असे आवाहनही त्यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com