Crime|Arrest Canva
गोवा

Mapusa Theft: चोरट्यांची माहिती मिळाली! म्हापसा 'ज्वेलर्स चोरीप्रकरणी' पोलिसांचे तिसरे पथक मुंबईला रवाना

Mapusa Crime: म्हापसा पोलिसांच्या तपास पथकांकडून चोरांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू झाले त्यानुसार पोलिसांच्या हाती टोळीबाबत महत्त्वाची माहिती लागली असून लवकरच त्यांना अटक होण्याची दाट शक्यता

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Nasnodkar Jewellers Theft News

म्हापसा: बाजारातील चंद्रमोहन नास्नोडकर यांच्या मालकीचे ‘नास्नोडकर ज्वेलर्स’ दुकान फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीबाबत पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धारेदोरे सापडले आहेत. त्यानुसार म्हापसा पोलिसांचे तिसरे तपास पथक मुंबईला तातडीने रवाना झाले.

यापूर्वीच दोन पथके ही मुंबईत पोहोचली होती. याप्रकरणी पोलिसांनी एकूण चार पथकांची स्थापना केली आहे. याच पथकांकडून शेजारील राज्यांत चोरट्यांचा शोध घेतला जात होता. या तपास पथकांच्या हाती दुकान फोडणाऱ्या चोरट्यांबाबत पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली असून, पोलिस पथके त्यांच्या मागावर आहेत. त्यामुळे सराफी दुकानातील चोरीतील चोरट्यांच्या लवकरच मुसक्या आवळल्या जातील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

रविवारी मध्यरात्री १२ ते २ च्या दरम्यान २० ते ३० वर्षे वयोगटातील चार चोरट्यांनी नास्नोडकर ज्वेलर्समधील ऐवजावर डल्ला मारला होता. या टोळीपैकी तिघे दुकानात तोंडाला रुमाल बांधून पोटमाळ्यावरून आतमध्ये शिरले, तर चौथा साथीदार हा दुकानाबाहेर कुणी येतोय का? यावर नजर ठेवून होता.

चोरी केल्यानंतर, दोन कापडी पिशव्यांत हा ऐवज भरून संशयितांची ही टोळी पायी चालत बाजारातून श्री महारुद्र देवस्थानापर्यंत गेली. तेथील एका हॉटेलच्या सीसीटीव्हीत ते टिपले गेले होते.

दरम्यान, उपलब्ध काही सीसीटीव्ही फुटेच्या आधारावरून पोलिसांनी या संशयितांची ओळख पटविली. त्यानुसार पुढील तपासाला गती मिळाली होती. त्याचप्रमाणे, चोरट्यांची ही टोळी थिवी रेल्वे स्थानकावरून पुढे रेल्वेने पलायन करण्यात यशस्वी ठरली. ही चोरीची घटना उघडकीस येताच, म्हापसा पोलिसांच्या विविध तपास पथकांकडून चोरांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यानुसार, पोलिसांच्या हाती टोळीबाबत महत्त्वाची माहिती लागली असून लवकरच त्यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.

माहिती देण्यात दिरंगाई

सराफी दुकानमालक चंद्रमोहन नास्नोडकर यांच्याकडून चोरीला गेलेल्या ऐवजाविषयी म्हापसा पोलिसांनी माहिती (चेक-लिस्ट) मागवली होती. मात्र, ती माहिती अद्याप पोलिसांना नास्नोडकर यांच्याकडून मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेच्या दिवशी, दुकानातील लॉकरमधील ऐवजाला चोरांनी हात न लावल्याने, हे दागिने सुरक्षित राहिले. या चोरांनी दुकानात प्रदशर्नास लावलेल्या दागिन्यांना लक्ष्य केले. तसेच फिर्यादीच्या दाव्यानुसार, चोरीला गेलेला ऐवज हा कोट्यवधी रुपयांचा आहे.

‘बोडगेश्वर’चरणी पोलिसांचे गाऱ्हाणे

तिसरे तपास पथक मुंबईला रवाना होण्यापूर्वी बुधवारी दुपारी म्हापसा पोलिसांनी म्हापशासह गोमंतकीयांचा राखणदार असलेल्या जागृत श्री देव बोडगेश्वराचा आशीर्वाद घेऊन देवाला गाऱ्हाणे घातले. त्यांनतर तपास पथक पुढे मुंबईला गाडीने रस्त्यामार्गे रवाना झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

Farmagudhi to Bhoma Road: फर्मागुढी-भोम रस्ता काम होणार सुरु! मंत्री कामतांची ग्वाही; बांदोडा ‘अंडरपास’चे उद्‌घाटन

Chimbel Unity Mall: 'चिंबल' ग्रामस्थांचे मोठे यश! युनिटी मॉल बांधकाम परवान्याला दिले आव्हान; सरकारी पक्षाचा विरोध फेटाळला

SCROLL FOR NEXT