Mapusa Theft: चोर पोचले मुंबईत? म्हापसा सराफ दुकान चोरीच्या तपासासाठी पोलिसांची पथके रवाना

Mapusa Theft News: दुकान फोडून कोट्यवधींचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा पोलिसांना अजून ठावठिकाणा लागलेला नाही
Mapusa Theft News: दुकान फोडून कोट्यवधींचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा  पोलिसांना अजून ठावठिकाणा लागलेला नाही
Goa Theft News Canva
Published on
Updated on

Mapusa Jewellers Theft News

म्हापसा : येथील बाजारातील चंद्रमोहन नास्नोडकर यांच्या मालकीच्या ‘नास्नोडकर ज्वेलर्स’ दुकान फोडून कोट्यवधींचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा पोलिसांना अजून ठावठिकाणा लागलेला नाही. या चोरांच्या शोधार्थ पोलिसांची विविध पथके शेजारील राज्यात दाखल झाली आहेत.

रविवारी मध्यरात्री १२ ते २ यादरम्यान २० ते ३० वर्षे वयोगटातील तिघा चोरट्यांनी ‘नास्नोडकर ज्वेलर्स’मधील ऐवजांवर डल्ला मारला होता. दुकानासमोरील लोखंडी वीजखांबावर चढून संशयित नास्नोडकर ज्वेलर्सच्या पोटमाळ्यावर चढले.

तेथील लोखंडी गेट कापून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. तसेच चोरट्यांनी दोन कापडी पिशव्यांत हा ऐवज भरून नेला होता. चोरी केल्यानंतर संशयित बाजारपेठेतून चालतच महारुद्र मंदिरापर्यंत जात असतानाचे तेथील एका हॉटेलच्या सीसीटीव्हीत टिपले आहे.

दरम्यान, संशयितांची पोलिसांनी ओळख पटविली असून त्यांचा शोध शेजारील राज्यांत तसेच महत्त्वाच्या चोर बाजारात घेतला जात आहे. तसेच पोलिसांनी सर्व हॉटेल आणि लॉज पिंजून काढली मात्र पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागले नाही.

Mapusa Theft News: दुकान फोडून कोट्यवधींचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा  पोलिसांना अजून ठावठिकाणा लागलेला नाही
Mapusa Theft: पोलिस गस्त असतानाही चोरट्यांचा धुमाकूळ! वीजखांबावर चढून दागिन्यांवर डल्ला; कोट्यवधींचे दागिने लंपास

चोर पोचले मुंबईत...

या चोरांचा शोध घेण्यात सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरले. शहरातील व आजूबाजूच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्याआधारे पोलिसांनी या संशयिताची ओळख पटविली. तिघाही संशयितांनी शर्ट-पँट घातले होते. तसेच मोबाईल टॉवर्सचा लोकेशन शोधत, पोलिसांकडून या संशयिताचा मागोवा काढला जात आहे. या संशयितांची हालचाल पोलिसांना मुंबई शहरात आढळल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com