Music Festival Dainik Gomantak
गोवा

Music Festival: म्हापशात रंगणार स्वर अभिषेकी संमेलन

14 वे भावभक्ती संगीत संमेलन स्वर अभिषेकीचे आयोजन 25 व 26 फेब्रुवारी रोजी म्हापशात होणार आहे.

दैनिक गोमन्तक

Music Festival: स्वर्गीय दत्ताराम पालयेकर चॅरिटेबल ट्रस्ट प्रस्तुत तसेच कला व संस्कृती संचालनालय यांच्या सहकार्याने 14 वे भावभक्ती संगीत संमेलन स्वर अभिषेकीचे आयोजन 25 व 26 फेब्रुवारी रोजी म्हापशात होणार असल्याची माहिती ट्रस्तर्फे माजी मंत्री विनोद पालयेकर यांनी दिली. बुधवारी सायंकाळी ते म्हापशात माध्यमांशी बोलत होते.

पालयेकर पुढे म्हणाले, या संमेलनाचे उद्‍घाटन 25 रोजी सायंकाळी 5.30 वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर भाव-अभिषेकचा कार्यक्रम रंगणार असून यात आर्या आंबेकर, समृद्ध चोडणकर, केतकी माटेगावकर यांचे गायन होईल.

या संगीत संमेलनाचे निवेदन हे डॉ. अजय वैद्य, गोविंद भगत व सिद्धी उपाध्ये करतील. सदर कार्यक्रम हा म्हापसा येथील हनुमान नाट्यगृहात होणार आहे. मध्यंतरी कोविड महामारीच्या काळात मागील तीन वर्षे हे संमेलन होऊ शकले नाही.

त्यामुळे रसिकवर्गांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. या संमेलनास दरवर्षी गोव्यातूनच नव्हे, तर इतर राज्यातून रसिकवर्ग भरभरुन प्रतिसाद देतात. त्यामुळे यंदाही आम्हाला मायबाप प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल, अशी आशा पालयेकर यांनी व्यक्त केली.

गंधर्व-अभिषेक

26 रोजी सकाळी 9 वा. गंधर्व-अभिषेक कार्यक्रम रंगेल. ज्यात मंजुषा पाटील व आनंद भाटे हे गायन करतील. तर सायंकाळी 6 वा. स्वर-अभिषेक रंगेल, ज्यात विश्वजित मेस्त्री, शौनक अभिषेकी, जयतीर्थ मेवुंडी, डॉ. राजा काळे यांचे गायन सादरीकरण होईल, असे पालयेकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

SCROLL FOR NEXT