Mapusa Municipality
Mapusa Municipality Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipality: म्हापसा पालिकेतील सावळागोंधळ

दैनिक गोमन्तक

Mapusa Municipality: कार्निव्हल साजरा करण्यासाठी म्हापसा पालिका मंडळातर्फे आयोजनासाठी कमिटी काढण्यासाठी मागील तीन-चार दिवसांपासून अंतर्गत बैठकांचे सत्र सुरू आहे. अशावेळी विरोधी गटातील काहींचे नावे या कमिटीत नियुक्त करण्यात आली. मात्र ऐनवेळी ही नावे बाजूला सारून पुन्हा नवीन कमिटी काढल्याचे ऐकिवात आहे.

यावरून विरोधी नगरसेवकांनी सध्या रणकंदन पेटविले असून ते सत्ताधाऱ्यांवर सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांतून तुटून पडताना दिसताहेत. विशेष म्हणजे, नगरसेविका ब्रांगाझा यांनी शुक्रवारी सकाळी म्हापसा कार्निव्हल समितीच्या सरचिटणीसपदावरून आपला राजीनामा दिला.

हा राजीनामा त्यांना देण्यासाठी भाग पाडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पालिकेतील हा सावळागोंधळ सध्या शहरात नवीन चर्चेचा विषय बनलाय.

महापौरांची मार्केटकडे पाठ!

पणजी महापालिकेच्या नव्या मार्केट संकुलातील बेशिस्त व्यापाऱ्यांना वठणीवर आणण्याचा विडा माजी महापालिका आयुक्त संजीत रॉड्रिग्ज यांनी उचलला होता. त्यांनी मार्केटमध्ये बेशिस्त व बेकायदेशीरपणे जागा अडवून व्यापाऱ्यांना येण्या-जाण्याची मोकळी वाट कमी अडविली होती. मात्र त्यांनी केलेल्या कारवाईने या व्यापाऱ्यांना चांगलीच शिस्त शिकवली होती.

कोणाचे न ऐकता सर्वांना दिलेल्या जागेतच व्यापार करण्यास सक्ती केली. मात्र त्यांच्या बदलीनंतर पुन्हा मार्केटमध्ये आबादी आबाद सुरू आहे. त्यांच्यामागून अनेक आयुक्त आले व गेले मात्र रॉड्रिग्ज यांनी केलेले धाडस इतरांना जमलेले नाही.

महापौरांनी पदाचा ताबा घेतल्यावर काही दिवस मार्केटमध्ये फेरफटका मारला, मात्र ते सुद्धा या व्यापाऱ्यांच्या बेशिस्तीला कंटाळून त्यांनी तेथे जाणेच सोडून दिले आहे. मार्केटमध्ये मोकळ्या जागेतही व्यापारी आपला माल ठेवून व्यापार करत आहेत.

सोपो गोळा करणारे कर्मचारी हे सुद्धा या बेकायदेशीर माल ठेवून बसलेल्यांकडून सोपो जमा करत आहेत. त्यामुळे त्यांचीही चंगी झाली आहे. मार्केटवर कोणाचेच बंधन राहिलेले नाही.

केपे पालिकेत बदल होणार का?

केपेच्या नगराध्यक्ष सुचिता शिरवईकर यांनी आपल्याच मुलाला केपे पालिकेत चिकटविल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना पदावरून हटवा, अशी मोहीम सुरू झाली होती. बाबू कवळेकर यांच्या आशीर्वादाने शिरवईकर या अजून त्या पदाला चिकटून राहिल्या असल्या तरी प्रत्येक सत्ताधारी नगरसेवकाचा त्यांना पाठिंबा आहे असे नाही.

एका माजी नगराध्यक्षांना सुचिता यांना हटवून आपल्या उमेदवाराला तिथे आणायचे आहे. अशा परिस्थितीत मागच्या बाजूला आठवड्यात कलंगुट येथे एक ओव्हर नाईट पार्टी झाली. त्या पार्टीला केपे पालिकेतील सत्ताधारी गटातील तीन नगरसेवक उपस्थित होते. केपे पालिकेत होणाऱ्या सत्ता बदलाचा प्लॅन ठरविण्याची ही तयारी नव्हती ना?

मतदारांसमोर कसे जायचे हा प्रश्‍न

फोंडा पालिकेची येत्या एप्रिलमध्ये निवडणूक होणार आहे. सध्याच्या विद्यमान पालिका मंडळातील अर्धे नगरसेवक पुन्हा निवडणूक लढण्यास अनुत्सुक आहेत. कारण काय माहीत आहे, पालिका क्षेत्रात एकाही नगरसेवकाकडून ठोस असे कार्य झालेले नाही.

मागच्या काळात कोविड महामारी, त्यानंतर सरकार आणि पालिकेच्या तिजोरीत खडखडाट त्यातच नगराध्यक्षपदाची शर्यत यामुळे सुंदोपसुंदी. या सहा महिन्यात काही कामे मार्गी लागली, पण कार्यकाळ समाप्त झाला. त्यामुळे आता लोकांसमोर, मतदारांसमोर जायचे कसे? हा खरा प्रश्न या नगरसेवकांना सतावत आहे.

विकासाच्‍या ‘स्‍मार्ट’ कळा

‘स्‍मार्ट सिटी’ साकारण्‍याच्‍या नादात राजधानी पणजीची पुरती वाट लागली आहे. गेली तीन वर्षे पाहावे तेव्‍हा रस्‍त्‍यांत खड्डे खोदले जात आहेत. एकाच ठिकाणी वर्षातून तीन-तीनदा खोदाई होत आहे. सामान्‍य नागरिक, व्‍यावसायिक व पर्यटक पुरते मेटाकुटीला आले आहेत. विशेष म्‍हणजे आमदार, महापौर या विषयाकडे अगदी सहजतेने पाहात आहेत.

रस्‍त्‍यांमध्‍ये खोदलेले खड्डे जिवावर बेतत आहेत. पणजीमध्‍ये आठवड्याभरात एक डंपर, एक टँकर कलंडला आहे. ‘स्‍मार्टसिटी’ची कामे करणारा कंत्राटदार स्‍वत:च्‍या वाहनांना संरक्षण देऊ शकत नसेल तर सामान्‍य जनांची बात ती काय?

त्‍यातही सरकारने म्‍हणे मोपा येथे स्‍मार्ट सिटी साकारण्‍याचे ठरवले आहे. पणजीवासीय आज ‘स्‍मार्ट’ कळा सोसत आहेत; मोपावासीयांच्‍या नशिबी ती अनुभूती आली नाही म्‍हणजे मिळवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

Konkan Railway : कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडणार; माजोर्डा उड्डाण पुलाच्या कामामुळे परिणाम

OpenAI ची मोठी तयारी, ChatGPT नंतर सर्च इंजिन करु शकते लॉन्च; Google ला देणार टक्कर

SCROLL FOR NEXT