Mapusa Municipality|Shubhangi Vaigankar Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipality: म्हापशात कचरा टाकणाऱ्या 45 जणांवर दंडात्मक कारवाई करीत; 1 लाखाचा दंड वसूल

Mapusa Municipality: म्हापसा पालिकेने रात्रीच्या वेळी कचरा फेकणाऱ्यांना चाप बसावा, यासाठी सध्या कंबर कसली आहे.

दैनिक गोमन्तक

Mapusa Municipality: म्हापसा येथील पालिका कार्यक्षेत्रातील रस्त्यांशेजारी रात्रीच्या वेळी कचरा फेकणाऱ्यांना चाप बसावा, यासाठी म्हापसा पालिकेने सध्या कंबर कसली आहे. या अनुषंगाने शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत या पालिकेने कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यात 45 उल्लंघनकर्त्यांवर दंडात्मक कारवाई करीत 1 लाख रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर यांनी दिली.

शनिवारी सायंकाळी म्हापसा पालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी नगरसेवक विराज फडके, साईनाथ राऊळ, नूतन बिचोलकर, बार्बरा कारास्को, आशीर्वाद खोर्जुवेकर, अन्वी कोरगांवकर, प्रिया मिशाळ या उपस्थित होत्या.

हे उल्लंघनकर्ते अधिकतर पालिका क्षेत्राच्या शेजारील पंचायतमधील होते. अशावेळी या पंचायतींनी आपल्या परिसरातील कचरा व्यवस्थापनासाठी प्रयत्न करावेत. यासाठी सरकारची संबंधितांनी मदत घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्षांनी या पंचायतींना केले.

शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर, उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर तसेच इतर नगरसेवकांनी पालिका कर्मचाऱ्यासोबत मिळून शहरातील 45 ब्लॅक स्पॉटवर पहारा देत हे कोम्बिंग ऑपरेशन राबविले. अधिकतर उल्लंघनकर्ते हे मयडे, बस्तोडा, आसगाव, हळदोणा अशा म्हापसा शहराच्या शेजारील पंचायत क्षेत्रातील होते, असे नगराध्यक्षांनी सांगितले.

मोहीम सुरूच राहणार!

म्हापसा पालिकेकडून कचऱ्याचे व्यवस्थित वर्गीकरण केले जाते. पालिकेचे सफाई व इतर कर्मचारी हे म्हापसा शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत घेतात. तरीही रात्रीच्या वेळी काही बेजबाबदार उल्लंघनकर्ते शहरातील रस्त्यांवर मिळेल, तिथे कचरा आणून फेकतात.

परिणामी, शहरवासीयांना वाटते, की पालिका कचरा उलचत नाही, कारण या कचऱ्यामुळे शहरास गलिच्छ रुप मिळते. अशावेळी नगरसेवकांनी या उल्लंघनकर्त्यांना चाप बसावा, यासाठी हे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याचा निर्णय घेतला. यापुढे पालिकेकडून सप्राईज रात्रीची मोहिम सुरुच राहणार असल्याचे नगराध्यक्ष तसेच नगरसेवक साईनाथ राऊळ म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐन चतुर्थीच्या तोंडावर असोला नारळ महागला, लोकांमध्ये चिंता; Watch Video

Goa Assembly Session: गोव्यात लवकरच सहकारी संस्थांसाठी ‘नवा कायदा’ , महाराष्ट्रातील MOFAच्या धर्तीवर सावंत सरकारचा मोठा निर्णय!

Goa Agriculture: काजू बागायतीत भाजीपाला, फळाफुलांचा मळा; पार्सेतील शेतकरी दाम्पत्याचा अभिनव प्रयोग

Goa Assembly Live: माझ्या मंत्रिमंडळात तीन ओबीसी मंत्री असल्याचा अभिमान

Digvesh Rathi: आयपीएलमधील वादानंतर दिग्वेश राठीची पुन्हा तीच चूक, DPL मध्ये फलंदाजासोबत बाचाबाची; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT