Goa Taxi App: गोव्यात जीत आरोलकरांची शिष्टाई यशस्वी ठरली! मांद्रेवासीय आघाडीवर; तर पेडणे पिछाडीवर

Goa Taxi App: गोव्यात पर्यटन खात्याने पेडणेत टॅक्सी व्यावसायिकांसाठी नावनोंदणी शिबिर आयोजित केले होते.
Goa Taxi App
Goa Taxi AppDainik Gomantak

Goa Taxi App: मोपा विमानतळावरील पर्यटन खात्याच्या टॅक्सी काऊंटरवर नावनोंदणी करण्यात मांद्रे मतदारसंघातील टॅक्सी व्यावसायिक आघाडीवर राहिले, तर पेडणे मतदारसंघातील टॅक्सी व्यावसायिक फिरकलेच नाहीत. त्यामुळे नोंदणीच्या पहिल्या दिवशी मांद्रेतील 137 जणांनी नोेंद केली. यात आमदार जीत आरोलकर यांची शिष्टाई यशस्वी ठरली.

पर्यटन खात्याने पेडणे येथे शनिवारी टॅक्सी व्यावसायिकांसाठी नावनोंदणी शिबिर आयोजित केले होते. त्यात पेडणे तालुक्यातील 450 टॅक्सी व्यावसायिकांना संधी मिळणार आहे. 31डिसेंबरपर्यंत वाहतूक खात्याकडे नावनोंदणी केलेले फक्त पेडणे तालुक्यातील बॅचधारक चालक येथे नावनोंदणी करू शकतात.

शनिवारी मांद्रे येथील जिल्हा पंचायत सभागृह आणि पेडणे येथील सरकारी विश्राम गृहावर खास नावनोंदणी शिबिर आयोजित केले होते. पण पर्यटन खात्याच्या या काऊंटरविषयी टॅक्सी व्यावसायिकांच्या मनात शंका असल्याने त्याला विरोध करण्यासाठी आज सकाळपासून मांद्रे मतदारसंघातील टॅक्सी व्यावसायिक गोळा झाले होते.

गोवा माईल्सप्रमाणे हा काउंटरसुद्धा टॅक्सी व्यावसायिकांच्या डोळ्यांत धूळ फेकणारा आहे, असे मत या व्यावसायिकांचे झाले होते. सकाळी 11 वाजता आमदार जीत आरोलकर त्याठिकाणी आले. यावेळी टॅक्सी व्यावसायिकांनी या काऊंटरवर विश्वास नसल्याचे सांगितले आणि या काऊंटरवर नावनोंदणी करायचीच नाही, असा पवित्रा घेतला.

मात्र, आमदार आरोलकर यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करताना गोवा माईल्स आणि पर्यटन खात्याचा हा काऊंटर या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असल्याचे सांगितले. ‘मोपा’वरील हा काऊंटर फक्त पेडणे तालुक्यातीलच टॅक्सी व्यावसायिकांसाठीच आहे.

Goa Taxi App
Goa Corona Update: गोव्यामध्ये कोरोनाची लागण अत्यंत कमी असली; तरीही कोणताही धोका पत्करणार नाही- डॉ. राजेंद्र बोरकर

पर्यटन खात्याच्या दरानुसार पर्यटकांकडून भाडे आकारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे हे भाडे सर्वांनाच परवडण्यासारखे आहे. या काऊंटरवर पेडण्यातील 450 जणांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे बिनधास्त नावनोंदणी करावी, असे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी पर्यटन खात्यातर्फे आलेल्या गोवा इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टॅक्सी व्यावसायिक पर्यटन खात्याच्या ॲपवर ऑनलाईन पद्धतीने कशी नावनोंदणी करू शकतात, याचे प्रात्यक्षिक दाखवले.

पेडणेकरांना हवे काळी-पिवळी टॅक्सी काऊंटर

या ॲपची सुरुवात 5 जानेवारीपासून होईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. मोपा विमानतळावर हे ॲप अनिवार्य असून केवळ ॲप आधारित टॅक्सींना क्यू सिस्टमनुसार भाडे मिळेल, अशी घोषणा करण्यात आली आहे. याला काही टॅक्सीचालकांचा विरोध आहे.

काल सरकारच्या पर्यटन खात्याने या टॅक्सीचालकांची नोंदणी करण्यासाठी पेडणे येथे सुरुवात केली असता, यावर पेडणे मतदारसंघातील टॅक्सीचालकांनी बहिष्कार घालत काळी-पिवळी टॅक्सीसाठी स्वतंत्र काउंटर देण्याची मागणी केली.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री-

मोपा विमानतळावर ॲप आधारित टॅक्सी सेवा, क्यू सिस्टमसह सुरू करण्यात येणार आहे. हे ॲप सर्व टॅक्सी व्यावसायिकांना बंधनकारक असेल. ॲपवर जे भाडे नोंद होईल, ते प्रवासी अदा करतील. त्यात व्यावसायिकांचे नुकसान होणार नाही. यापुढे टॅक्सी व्यावसायिकांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com