Mapusa Pre Monsoon Work Dainik Gomantak
गोवा

Mapusa: म्हापसा परिसरात मान्सूनपूर्व नालेसफाईला वेग! एकूण खर्च रु.60 लाख, आतापर्यंत 65 टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण

Mapusa Pre Monsoon Work: येथील पालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांना वेग दिला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: येथील पालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांना वेग दिला आहे. आतापर्यंत ६५ टक्क्यांहून अधिक नालेसफाईची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी उर्वरित कामे पूर्ण होतील, असा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे. यावर्षी म्हापसा नगरपालिकेने सर्व २० वॉर्डांमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी सुमारे ६० लाख रुपयांची निविदा काढली असून, त्याअंतर्गत म्हापसा बाजारपेठेतील नालेसफाईचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.ने विशेष उपाययोजना केल्या आहेत.

पालिका अभियंते व अधिकारी या कामावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, बाजारपेठेतील काही नाल्यांमध्ये तेलकट गाळ (ओयली स्लज) साचल्याने सफाई कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत. याबाबत आवश्यक कारवाईसाठी पालिका आरोग्य विभागाला पत्र देण्यात येणार आहे.

नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांनी सांगितले की, बाजारपेठेसह सर्व २० वॉर्डांमध्ये नालेसफाईचे काम वेगाने सुरू असून आतापर्यंत ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. तसेच शहरातील सखल व पूरप्रवण भागातील मोठ्या नाल्यांची सफाई जलस्रोत विभागाने आधीच पूर्ण केली आहे. विशेषतः खोर्ली येथील उपसकर नाला हा या भागातील पाण्याचा निचरा करणारा मुख्य नाला असल्याने, गेल्या वर्षीच्या पुराचा अनुभव लक्षात घेऊन पालिके

दोन बांधकामांना नोटिसा

खोर्ली येथील उपसकर नाल्यावर अतिक्रमण करणाऱ्या दोन बांधकामांना पालिकेने नोटिसा बजावल्या असून, त्यांच्यावर सुनावणी घेतली जाणार आहे. याशिवाय जलस्रोत विभागाने यावर्षी नाल्यातील पाण्याचा जमिनीत उपसा व्हावा यासाठी तळभागावरील काँक्रीटचा थर काढून टाकला असून, आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याचे कामही हाती घेतले आहे. त्यामुळे यंदा म्हापसेकरांना पुराचा फटका बसणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT