Mapusa Municipality Dainik Gomantak
गोवा

Goa Municipality: येत्या दहा दिवसांत बदलणार म्हापसा नगराध्यक्ष अन् उपनगराध्यक्ष!

Goa Municipality: मुख्यमंत्र्यांसह भाजपा प्रदेशाध्यक्षांना विश्वासात घेतले जाणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Municipality: म्हापसात येत्या दहा दिवसांत नगराध्यक्षासह उपनगराध्यक्ष फेरबदलचा निर्णय घेतला जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांसह भाजपा प्रदेशाध्यक्षांना विश्वासात घेतले जाणार आहे, असे स्पष्टीकरण उपसभापती तथा आमदार जोशुआ डिसोझा (Joshua Dsouza) यांनी दिले. म्हापसा येथे हनुमान नाट्यगृहात आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित प्रदर्शनास त्यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

डिसोझा म्हणाले, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा वर्षभराचा कार्यकाळ यापूर्वी संपुष्टात आला होता. मात्र, मध्यंतरी केंद्र भाजपा सरकारच्या आठ वर्षांच्या सेलेब्रेशननिमित्त कार्यक्रम, विधानसभा तसेच पंचायत निवडणूक आणि नंतर गणेश चतुर्थी आली. त्यामुळे हा बदलाचा कार्यक्रम राहिला. मात्र, आता मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्षांना विश्वासात घेत हे फेरबदल केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

* काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपा प्रवेश केला आहे, यासंदर्भात विचारले असता उपसभापती म्हणाले, ही घडामोडी आश्चर्याची नव्हती. या प्रवेशामुळे भाजपची ताकद आणखी वाढली असून हा पक्षाचा निर्णय आहे.

* आमदार मायकल लोबोंवर भाष्य करताना ते म्हणाले, मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. तर यापूर्वी लोबो हे भाजपात होते. मात्र आपल्या वैयक्तिक कारणांसाठी त्यांनी पक्ष सोडला. परंतु, आपली चूक लक्षात येताच, ते पुन्हा भाजपात आले. आम्ही त्यांचे स्वागत करतो.

जोशुआ डिसोझा, उपसभापती-

चतुर्थीपूर्वी नवीन पालिका मुख्याधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला असून नगरसेवकांकडून त्यांच्या कामाची प्रशंसा होत आहे. येत्या काही दिवसांत मी नगरसेवक तसेच पालिका प्रशासनांची संयुक्त बैठक घेऊन कामाचा आढावा घेणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Temba Bavuma Record: बावुमाचे 'मिशन वर्ल्ड रेकॉर्ड'! गुवाहाटीत भारताला हरवून इतिहास रचण्याची संधी, जे कुणालाच नाही जमलं ते करुन दाखवणार

नावेलीत मांस दुकानात गायीचे कापलेले शिर आढळल्याने खळबळ, दुकानदाराला अटक, नंतर जामिनावर सुटका; काय नेमकं प्रकरण?

लहानग्या 'अमूर फाल्कन'ची थक्क करणारी भरारी! एका दिवसात 1000 किमी प्रवास करुन रचला नवा कीर्तिमान; वन्यजीव संशोधकही हैराण

Dacoity Case Goa: तोंडावर मास्क, हातात शस्त्र, घरातल्यांना केली जीवघेणी मारहाण; बायणात सव्वाकोटींचा ऐवज घेऊन 8 दरोडेखोर पसार

New Rent Rules: भाडेकरु आणि घरमालकांसाठी 'नवीन रेंट करार नियम 2025' लागू, वाद मिटवण्यासाठी विशेष न्यायालये; वाचा काय आहेत नवे नियम?

SCROLL FOR NEXT