Mapusa Municipality Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipality: दुकान परवान्‍यांचे नूतनीकरण रखडले; म्हापसा पालिकेला करोडोंचे नुकसान

म्हापसा पालिकेने भाडेपट्टीवर दिलेली हजारांहून अधिक दुकाने व स्टॉल्‍सच्या परवान्यांचे नूतनीकरण केलेले नाही. याबाबत गोवा खंडपीठाने मुख्याधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागितले.

दैनिक गोमन्तक

Mapusa Municipality: म्हापसा पालिकेने भाडेपट्टीवर दिलेली हजारांहून अधिक दुकाने व स्टॉल्‍सच्या परवान्यांचे नूतनीकरण केलेले नाही. तसेच त्याचा लिलाव करून भाडेही वाढविले नाही. त्यामुळे पालिकेचा कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याची याचिका जवाहरलाल शेट्ये यांनी सादर केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पालिका प्रशासन संचालकांना याचिकेतील उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांची चौकशी करून तसेच म्हापसा पालिका मुख्याधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्र दोन आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी 22 फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली.

म्हापसा पालिका मालकीची दुकाने व स्टॉल्‍स भाडेपट्टीवर दिलेली मुदत संपलेली आहे व त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण केलेले नाही. गोवा पालिका कायदा 1968च्या कलम 88(4)च्या तरतुदीनुसार जर मुदत संपल्यानंतर एखाद्याने दुकान वा स्टॉल रिक्त करण्यास नकार दिल्यास त्याला तेथून हटवण्याचा अधिकार पालिकेला आहे.

पालिकेने ही दुकाने वा स्टॉल्‍स ज्याला पूर्वी दिले होते, त्याच्या नातेवाईकाला देण्यास, पोटभाडेपट्टीवर तसेच तीन वर्षांची मुदत संपल्यानंतरही त्याला मुदतवाढ न देता त्या मालकाच्या ताब्यात ठेवण्यास देत आहे. यामध्ये पालिका अधिकारी व नगरसेवकांमध्ये लागेबांधे आहेत. त्यामुळे ते दुकाने व स्टॉलधारकांना पाठिशी घालत आहेत.

या प्रकरणामुळे म्हापसा पालिकेचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. त्यामुळे या घोटाळ्याची चौकशी करण्याचे तसेच बुडालेला महसूल वसूल करण्याचे निर्देश द्यावेत.

तसेच जे कोणी या घोटाळ्यात गुंतलेले आहेत त्यांच्याविरुद्ध एफआरआय नोंद करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकादाराने केली आहे. याचिकेत सरकारसह पालिका प्रशासन संचालनालय, म्हापसा पालिका व दक्षता खाते यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT