Mapusa Municipal workers Strike Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipal workers Strike : म्हापसा पालिकेचे कर्मचारी बेमुदत संपावर

21 रोजी अखिल गोवा पालिका कर्मचारी संघटनेने म्हापसा पालिकेला नोटीस दिली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Municipal workers Strike : म्हापसा पालिकेचे कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. आज शुक्रवारी सकाळी 7.30 वाजल्यापासून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या पालिकेने पूर्ण न केल्यामुळे संपावर जात असल्याची माहिती कामगार संघटनेचे नेते केशव प्रभू यांनी कालच दिली होती.

कामगारांच्या मागणीपत्रात, वैद्यकीय भत्ता हा 6 हजार रुपयांवरुन तो 8 हजार करावा. तसेच शस्त्रक्रिया आणि आजारपणात कर्मचारी किंवा त्यांच्या कुटूंबीयांना जीएमसीत उपचार मिळावा. जीएमसीत उपचार नसल्यास इतरत्र खासगी इस्पितळात उपचार द्यावेत. या वैद्यकीय खर्चाची जबाबदारी पालिकेने स्वीकारावी. त्याचप्रमाणे, कचरा, ध्वजारोहण, रेनवेअर भत्ता, हाऊसिंग योजना, कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती अशा एकूण 19 कलमी मागणी पत्राच्या पूर्ततेसाठी अखिल गोवा पालिका कर्मचारी संघटनेने म्हापसा पालिकेला नोटीस दिली होती.

मात्र, ही मागणी पूर्ण न केल्यास बेमुदत संप पुकारला जाईल, अशा इशारा यातून दिला होता. त्याचप्रमाणे पालिका मंडळ यावर कोणतीही पावले उचलत नसल्याने निषेध म्हणून पालिका कर्मचार्‍यांनी दि. 3 ऑक्टोबरपासून दंडावर काळीपट्टी बांधून आपले कर्तव्य बजावत होते. तर दुपारी जेवणाच्या वेळी कार्यालयासमोर निदर्शने करीत होते. त्यानुसार शुक्रवार सकाळी 7.30 वाजल्यापासून या संपाला सुरुवात झाली आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Atishi In Goa: भ्रष्टाचारावर बोलणाऱ्यांची पदावरुन हकालपट्टी केली जाते, गोव्यात 'आप'च एकमेव पर्याय; आतिषी भाजपवर कडाडल्या

India vs Pakistan: "कुठल्या तोंडानं पाकिस्तानसोबत सामना खेळणार? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून ओवैसी आक्रमक, PM मोदींना केला सवाल

Goa Assembly: गोव्यातून दारु तस्करी रोखण्यासाठी सरकार घेणार होलोग्राम स्टिकर्सची मदत; महाराष्ट्राच्या सीमेवर उभारणार चेकपोस्ट

Goa Assembly Session: "गोवा विद्यापीठाच्या प्रकरणावर सभागृह समिती स्थापन करा" युरी आलेमाव

Viral News: तुम्ही म्हणाल 'शी.. घाण' पण, स्वीडिश प्रौढ मनोरंजन कंपनी कर्मचाऱ्यांना देतंय 30 मिनिटांचा खास ब्रेक, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT