Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Mapusa: म्हापसा पालिकेतील गहाळ फाईल्स प्रकरणात निलंबनाची कारवाई करा! गोवा काँग्रेसची मागणी; जोशुआंकडून तक्रार दाखल

Mapusa Municipal Missing Files: नगरपालिकेतील कामासंदर्भातील फाईल्स गहाळ होत आहेत, याविषयी उपसभापती तथा आमदारांनी शुक्रवारी पोलीस तक्रार दिली आहे.

Sameer Panditrao

म्हापसा: नगरपालिकेतील कामासंदर्भातील फाईल्स गहाळ होत आहेत, याविषयी उपसभापती तथा आमदारांनी शुक्रवारी पोलीस तक्रार दिली आहे. याची दखल घेत, काँग्रेसने म्हापसा पालिकेतील भोंगळ प्रशासकीय कारभारावर टीका करताना, उपसभापतींच्या तक्रारीची गांभीर्याने चौकशी करावी.

दोषींवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. येत्या दोन दिवसांत काँग्रेस पोलीस स्थानकात जाऊन या प्रकरणी तपास कुठवर आला आहे, याचा जाब विचारणार आहे, अशी आक्रमक भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

पालिकेचा नगराध्यक्ष या नात्याने, ज्यांच्या कार्यकाळात फाईल्स गायब झाल्या, त्यांचे निलंबन करावे व संबंधित मुख्याधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करावी. कारण संबंधितांना पालिकेचा कारभार चालवता येत नाही, अशी मागणी म्हापसा काँग्रेस मंडळ अध्यक्ष शशांक नार्वेकरांनी केली. मुळात पालिकेतील फाईल्स गहाळ होत असल्यास पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी याप्रकरणी तक्रार देणे अनिवार्य बनते.

जेव्हा-जेव्हा असमर्थ व्यक्तीला खुर्चीवर विराजमान केले जाते, असे प्रकार घडतात. पालिकेतील प्रशासकीय कारभार पूर्णतः कोलडमल्याची टीका नार्वेकरांनी केली. पालिकेतील सर्व फाईल्सची हाताळणीबाबत ट्रॅकिंग सिस्टम असणे आवश्यक असल्याचे नार्वेकर म्हणाले.

शनिवारी (ता. २२) म्हापसा येथे काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. शशांक नार्वेकर, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विरेंद्र शिरोडकर व मिताली गडेकर या उपस्थित होते.

पालिकेतील भोंगळ कारभार तसेच कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तपणावर लगाम लागावी, यासाठी उपसभापतींनी सध्या आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसते. म्हापसा पालिका कार्यालयातून लोकांच्या कामासंदर्भातील फाईल्स गायब व गहाळ होण्याचे प्रकार वाढल्याने, याविषयी उपसभापती जोशुआ यांनी शुक्रवारी म्हापसा पोलिस निरीक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे.

बेपर्वाह व बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी आमदारांनी केली आहे. त्याचप्रमाणे, पालिकेतील हजेरीपट्टीत फेरफार होण्याच्या प्रकारची देखील चौकशी करा, असेही उपसभापतींनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

यासंदर्भात उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, म्हापसा पोलिस निरीक्षकांकडे आज शुक्रवारी मी लेखी तक्रार दिली आहे. मिसिंग फाईल्स व हजेरीपट याबाबत ही तक्रार आहे. म्हापसा पालिकेतून वारंवार फाईल्स गहाळ होऊ लागल्या आहेत. लोकांच्या तक्रारी माझ्यापर्यंत पोहोचल्या होत्या. मुळात लोकांना एकाच कामाची फाईल्स पुन्हा-पुन्हा नव्याने तयार करून द्यावी लागते.

मुळात एकदा फाईल इनवर्ड झाली की, त्याची देखरेखीची जबाबदारी ही पालिका व संबंधित कर्मचाऱ्यांची असते. याविषयी कर्मचाऱ्यांना जाब विचारल्यावर गायब फाईल्स पुन्हा मिळतात.

अशावेळी या बेशिस्तपणावर वचक यावी व दोषींवर कारवाई व्हावी या हेतूनेच मी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश आपण दिल्याचे उपसभापतींनी स्पष्ट केले.

जोशुआ यांनी या फाईल्स व्यतिरिक्त हजेरीपटाविषयी देखील दिली आहे. कारण, पालिकेतील काही कर्मचारी हजेरीपटावर सही करुन, कार्यालयातून गायब होतात. तर काहीवेळी प्रॉक्सी सह्यांचे प्रकार होऊ लागल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. अनेक कर्मचारी सकाळच्या सत्रात सही करतात व नंतर पालिकेतून इतरत्र जातात. काहीजण दिवस-दिवसभर कार्यालयात हजर नसतात, असेही उपसभापतींनी तक्रारीत म्हटले आहे.

मायकल लोबो काय बोलणार?

भिके म्हणाले, आमदार लोबोंनी म्हापशाच्या आमदारांवर टीका केली होती. लोबो ढवळाढवळ करतात, कारण आपल्या कुटुंबातील कोणाला तरी निवडणुकीत जागा निर्माण करु पाहत आहेत. दुसरीकडे त्यांच्या मतदारसंघातील सरपंच हे नाईट क्लबमुळे निर्माण झालेल्या समस्येबाबत भाष्य करीत आहेत. यावर मायकल लोबो काय बोलणार? स्वतःचे घर सोडून ते दुसऱ्यांना सल्ला कसा देऊ शकतात? सध्या मंत्रिमंडळ बदल होणार असल्याने, लोबो दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''आशिष नेहराच्या कॉटेजला पंचायतीची परवानगी नाही'' केळशी ग्रामसभेत वादळी चर्चा

Salcette: पॉप्युलर हायस्कूलमध्ये 'चतुर्थीचा बाजार'; विद्यार्थ्यांडून सजावट, माटोळी साहित्याची विक्री

Goa Live News: "गोव्यातील माटोळी विक्रेत्यांकडून सोपो वसूल करू नये" मुख्यमंत्री

Sanquelim Road Issue: देसाईनगर साखळीतील रस्ता बनला धोकादायक; तातडीने डागडुजीची करण्याची रहिवाशांची मागणी

Panjim: मांडवी किनाऱ्यावरील अष्टमीच्या फेरीला जत्रेचे स्वरूप, सुटीमुळे खरेदीसाठी उडाली झुंबड

SCROLL FOR NEXT