Mapusa Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipal Council: म्हापसा नगरपालिका मंडळाची बैठक रद्द करण्याची नगराध्यक्षांवर नामुष्की

नगरसेवकांच्या आक्षेपानंतर, म्हापसा पालिका मंडळाची शुक्रवारी बोलावलेली सर्वसाधारण सभा रद्द करण्याची नामुष्की नगराध्यक्षांवर ओढवली.

Kavya Powar

Mapusa Municipal Council: नगरसेवकांच्या आक्षेपानंतर, म्हापसा पालिका मंडळाची शुक्रवारी बोलावलेली सर्वसाधारण सभा रद्द करण्याची नामुष्की नगराध्यक्षांवर ओढवली. या बैठकीची नोटीस किमान सात दिवसांपूर्वी देणे बंधनकारक असते, परंतु या बैठकीच्या नियोजनात पालिका अधिनियमांचे सर्रासपणे उल्लंघन झाल्याचा ठप्पका ठेवत काही नगरसेवकांनी बैठकीला विरोध केला आणि नगराध्यक्षांकडून बेकायदाशीरपणा सुरू असल्याचा आरोप केला.परिणामी, नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांच्याकडे आजची बैठक रद्द करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.

शुक्रवारी (ता.१०) सकाळी ११वा. पालिका कार्यालयात म्हापसा पालिका मंडळाची सर्वसाधारण बैठक बोलावलेली. या बैठकीच्या अजेंड्यावर (कार्यक्रमपत्रिकेवर) १२ विषय चर्चेस होते. यावेळी मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर, उपनगराध्यक्ष विराज फडके व इतर नगरसेवक हजर होते.

या बैठकीच्या सुरवातीस मागील विशेष बैठकीचे इतिवृत्त वाचन सुरू होते. गेल्या ६ सप्टेंबरला पालिका मंडळाची विशेष बैठक याचप्रकारे बेकायदेशीरच बोलावण्यात आलेली. असे म्हणत नगरसेवक प्रकाश भिवशेट यांनी हस्तक्षेप नोंदविला. यास नंतर नगरसेवक अ‍ॅड. शंशाक नार्वेकर यांनीही पाठिंबा देत सत्ताधार्‍यांकडून बेकायदेशीरपणा सुरू असल्याचे म्हटले. त्यानंतर नगरसेवकांचा वाढता विरोध पाहून नगराध्यक्षांनी आजची बैठक रद्द करत असल्याचे जाहीर केले.

याविषयी प्रतिक्रिया देताना नगरसेवक प्रकाश भिवशेट म्हणाले की, चोवीस तासाच्या आत नोटीस काढून गेल्यावेळी विशेष बैठक बोलावली. मुळात, विशेष बैठकीसाठी किमान तीन दिवस आधी नोटीस देणे बंधनकारक असते. तसेच आपत्कालिनसाठी काही निकष असतात. परंतु, सोपो कंत्राटच्या चर्चेसाठी आपत्कालिन बैठक बोलावता येणार नाही. नैसर्गिक आपत्तीसाठी आपत्कालिन बैठकीचे आयोजन करता येते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

म्हापसा पालिकेच्या ढिसाळ प्रशासकीय कामकाज कारभारामुळे आजची बैठक रद्द करण्याची वेळ ओढवली. त्यामुळे पालिका प्रशासनच घडलेल्या प्रकारास जबाबदार असल्याचा आरोप भिवशेट यांनी केला.

नगरसेवक आनंद भाईडकर म्हणाले की, तांत्रिक मुद्द्यांवरुन आजची बैठक रद्द झाली. अशाप्रकारे बैठका रद्द होत राहिल्यास लोकांचे प्रश्न खितपत राहतील. याशिवाय, सर्वांचा वेळ वाया गेला. यात आमदारांनी लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.

मुळात बैठकीच्या नोटीसीवर मी ३ नोव्हेंबरला स्वाक्षरी केली होती. परंतु, काही नगरसेवकांना ही नोटीस पोहचण्यास थोडा उशिर झाला. त्यामुळे दोन नगरसेवकांनी आजच्या बैठकीवर आक्षेप घेतला. त्यामुळे बैठकीच्या आयोजन सात दिवसांच्या प्रक्रियेनुसार न झाल्याने ती रद्द करावी लागली.
प्रिया मिशाळ, नगराध्यक्षा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

Imran Khan: भारतीय दिग्गजांचा पाकिस्तानला 'बाऊन्सर'! इम्रान खानच्या मदतीला धावले कपिल देव अन् सुनिल गावस्कर; सरकारकडे केल्या 'या' 3 मागण्या

SCROLL FOR NEXT