Mapusa market electric shock Dainik Gomantak
गोवा

Mapusa: रस्त्यातून 'इलेक्ट्रिक शॉक'! म्हापसा मार्केटमधील विचित्र प्रकार; व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण

Mapusa Road Shock Incident: मार्केटमधील भूमिगत वीजवाहिनी तुटल्याने शकुंतलेच्या पुतळ्याजवळील रस्त्यावर इलेक्‍ट्रीक शॉक येऊ लागला. एका व्यक्तीस धक्का लागल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला.

Sameer Panditrao

म्हापसा: येथील मार्केटमधील भूमिगत वीजवाहिनी तुटल्याने शकुंतलेच्या पुतळ्याजवळील रस्त्यावर इलेक्‍ट्रीक शॉक येऊ लागला. एका व्यक्तीस धक्का लागल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. संभाव्य दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर म्हापसा वीज कर्मचाऱ्यांनी बाजारातील वीजपुरवठा तत्काळ खंडित केला.

म्हापसा बाजारपेठेतील रस्त्यावर करंट येण्याचा हा प्रकार पथदीप किंवा वीज वाहिन्यातील गळतीमुळे घडला असावा, असा अंदाज आहे. त्यामुळे लागलीच वीज पुरवठा खंडित करण्यात आला. याबाबतीत वीज कर्मचाऱ्यांमार्फत योग्य तपासणी केली जाईल, असे कार्यकारी वीज अभियंता सुभाष पार्सेकर यांनी सांगितले. हा प्रकार सोमवारी (ता.१८) रात्री ८ च्या सुमारास उघडकीस आला.

शकुंतलेच्या पुतळ्याजवळील एका दुकानात जाणाऱ्या व्यक्तीला वीजेचा धक्का लागला. त्यानंतर दुकानदारांनी वीज कर्मचाऱ्यांना पाचारण केले. तेव्हा पावसामुळे ओलसर झालेल्या परिसरातील सर्व रस्त्यावर करंट येत होता.

त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले. भूमिगत वाहिन्यांमध्ये किंवा पथदीपमध्ये गळतीमुळे हा करंट येत असल्याच्या संशयावरून वीज कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. तेव्हा रस्त्याच्या मधोमध मेसर्स आर. एस. म्हापसेकर यांच्या दुकानासमोर भूमिगत वीजवाहिनी तुटलेली आढळली.

या तुटलेल्या वाहिनीतील तारांतूनच करंट सर्वत्र पसरला गेल्याचे टेस्टरद्वारे केलेल्या तपासणीतून आढळून आले. त्यानंतर लगेच वीज कर्मचाऱ्यांनी बाजारपेठेतील वीजपुरवठा बंद केला. दरम्यान, या भूमिगत वीज वाहिनींसाठी वापरलेल्या दर्जाहीन उपकरणांवर व्यापारी वर्गाने त्याचवेळी आवाज उठवला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वर्षा उसगांवकर यांच्यासह 5 जणांना लाखोंचा गंडा! गुंतवणुकीच्या जाळ्यात अडकवून चित्रपट निर्मात्यानं लाटलं; नंबर बदलून झाला पसार

औद्योगिक विकासाला नवी चालना! वेर्णा येथे 'एनटीझेडएससीएच'चा प्रकल्प सुरू; 80 टक्के रोजगार गोमंतकीयांना

Mapusa Holi Violence: म्हापशात होळीच्या उत्साहाला गालबोट, हाणामारीत एक गंभीर जखमी; संशयितांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

दक्षिण पश्चिम रेल्वेचा फेब्रुवारीत मालवाहतुकीचा नवा उच्चांक, 14.31 टक्क्यांची वाढ; एकूण महसूल 8.550 कोटी

VIDEO: साऊथ आफ्रिकेसोबत 'चीटिंग'? नॉट आऊट असताना दिलं आऊट; अंपायरच्या एका चुकीनं स्वप्न भंगलं!

SCROLL FOR NEXT