Mapusa Market Redevelopment Dainik Gomantak
गोवा

Mapusa Market: म्हापसा मार्केटचा पुनर्विकास प्रकल्प लवकरच मार्गी लागणार, 3 टप्प्यांत चालना; 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित

Mapusa Market Redevelopment: आगामी पालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांकडून येथील पोर्तुगीजकालीन म्हापसा मार्केटचा पुनर्विकास प्रकल्प चालीस लावण्याची योजना आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा : आगामी पालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांकडून येथील पोर्तुगीजकालीन म्हापसा मार्केटचा पुनर्विकास प्रकल्प चालीस लावण्याची योजना आहे.

या पार्श्वभूमीवर म्हापसा मार्केट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत उपसभापती तथा स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा यांच्या अध्यधक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. तीन टप्प्यांत हा प्रकल्प पुढे नेण्यात येणार असून, मार्केट इमारतीच्या पुनर्विकासाचे काम गोवा राज्य नागरी विकास एजन्सीतर्फे हाती घेण्याची योजना आहे. यासाठी २० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

यावेळी व्यापाऱ्यांना मार्केटच्या पुनर्विकास प्रकल्प आराखड्याची पॉवर प्रेझेंटेशनद्वारे माहिती देण्यात आली. त्यानुसार, मार्केट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आराखड्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, हा कृती आराखडा मार्केट असोसिएशनच्या बैठकीसमोर मांडला जाईल. त्यानंतर व्यापाऱ्यांच्या हरकती व इतर सूचनांनुसार या आराखड्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

आजच्या बैठकीत नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट, मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर, वास्तुविशारद अश्विनीकुमार प्रभू, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र फळारी, सचिव सिद्धेश राऊत व पदाधिकारी, अखिल गोवा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नारायण कारेकर आणि पदाधिकारी, भाजप मंडळाध्यक्ष योगेश खेडेकर, म्हापसा बेकर्स, म्हापसा फुल मार्केट, अखिल गोवा एफएमसीजी, टेलिकॉम वितरक असोसिएशन या संघटनांचे पदाधिकारी, नगरसेवक, पालिका अभियंता, पालिका निरीक्षक व ‘जीसुडा’चे अधिकारी उपस्थित होते.

शकुंतला पुतळा परिसराचे सुशोभीकरण

उपसभापती जोशुआ यांनी सांगितले की, २० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. पोर्तुगीजकालीन इमारतीला लागलेली गळती रोखण्यासाठी इमारतीच्या छतावर पत्र्यांचे छप्पर घालणे, सध्या व्यापारी वर्गाने आपल्याला हवे त्या क्षमतेने छप्पर घातले आहे.

ते हटवून एका समान छप्पराचे आवरण उभारले जाईल. तसेच इमारतीची डागडुजी करणे, शकुंतला पुतळा परिसराचे सुशोभीकरण, अशी ही योजना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT