Mapusa Market News Dainik Gomantak
गोवा

Mapusa Market News: म्हापसा मार्केटमधील फाटकास व्यापारी वर्गाचा विरोध! उपसभापतींकडे मांडली कैफियत...

म्हापसा येथील मार्केटमधील शकुंतलेच्या पुतळ्यासह इतरत्र उभारलेल्या लोखंडी फाटकाला म्हापसा व्यापार्‍यांनी तीव्र आक्षेप घेतला.

दैनिक गोमन्तक

Mapusa Market News

म्हापसा येथील मार्केटमधील शकुंतलेच्या पुतळ्यासह इतरत्र उभारलेल्या लोखंडी फाटकाला म्हापसा व्यापार्‍यांनी तीव्र आक्षेप घेतला. या फाटकामुळे साहित्य (माल) ने-आण करण्यास अडथळा निर्माण होण्यासोबतच गिर्‍हाईकांवर याचा कथित परिणाम होईल, असा दावा करत सदर समस्येबाबत व्यापार्‍यांनी आज शनिवारी उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्याजवळ कैफियत मांडली.

त्यामुळे हे फाटक हटविण्यासोबत दिवसभर फाटक व्यापार्‍यांना मालाच्या वाहतूकीसाठी खुले ठेवण्याची मागणी केली. शनिवारी बाजारपेठेत व्यापार्‍यांनी उपसभापती डिसोझा यांची भेट घेतली.

यावेळी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, उपनगराध्यक्ष विराज फडके, मार्केट समितीचे चेअरमन नगरसेवक आशिर्वाद खोर्जुवेकर उपस्थित होते.तसेच म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत, सचिव सिद्धेश राऊत, पांडुरंग सावंत, गिरीश केणी, वैभव, राऊळ, योगेश वझरकर, अमेय पोकळे व इतर व्यापारी वर्गाने आपली समस्या उपसभापतींसमोर ठेवली.

पे-पार्कींग कंत्राटदामार्फत म्हापसा पालिकेने बाजारात फाटक उभारलेत. यामुळे आम्हाला दुकानांत माल आणण्यास अडथळा होईल. दुकाने सकाळी ९वाजता खुली होतात. त्याचवेळी हे फाटक लावून वाट अडविली जाईल. त्यापूर्वी दुकानात मोठ्या प्रमाणात माल आणून ठेवणे शक्य नाही. माल संपल्यावर पुन्हा तो आणावा लागेल.

याशिवाय दिव्यांग तसेच इतर ग्राहकांना ये-जा करण्यास अडथळा होईल. त्यामुळे व्यापारी वर्गाला विश्वात घेऊनच याच्या अंमलबजावणीबाबत विचार करावा, अशी विनंती व्यापारी गिरीश केणी, वैभव राऊळ व इतरांनी केली.

व्यापारी संघटनेचे सरचिटणीस सिद्धेश राऊत म्हणाले, लोकांच्या सोयीच्या उद्देशाने आम्ही बाजारात पे-पार्किंग करण्याची कल्पना दिली होती. मात्र, आता कंत्राटदाराने प्रवेशद्वारच बंद केले. दुसरीकडे पालिका महसूलावर लक्ष केंद्रीत करते. ज्या जागेवर २० लाखांचा निविदा होती, ती ५० लाखांना दिली गेली.

त्यामुळे हे पैसे वसूल करण्यासाठी कंत्राटदार लोकांकडून जास्त पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करणार. मुळात, बाजारात किती वाहने लागणार व त्यातून किती उत्पन्न मिळेल याचा व्यावहारिक विचार केला जात नाही, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले.

उपसभापती जोशुआ डिसोझा म्हणाले की, दिवसभर मार्केटमधील प्रवेशद्वार वाहनांसाठी खुले ठेवणे उच्चित ठरणार नाही. व्यापारी वर्गापूर्ताच हा विषय मर्यादित नसून इतरांचा विचार करणे माझी जबाबदारी आहे. सर्वांच्या दृष्टीकोनातून फाटक खुले ठेवण्याबाबत एक निश्चित वेळ ठरवली जाईल. यासाठी सर्वांना विश्वासात घेतले जाईल, असे आश्वासन त्यांनी व्यापार्‍यांना दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT