Neighbor Dispute Assault Mapusa Dainiak Gomantak
गोवा

Goa Crime: किरकोळ भांडणातून शेजाऱ्यांमध्ये हाणामारी ; खोर्ली-म्हापशात शाब्दिक वाद विकोपाला; एक गंभीर जखमी

Neighbor Dispute Assault Mapusa: क्षुल्लक वादातून दोन शेजारील कुटुंबांमध्ये झालेल्या संघर्षाने, म्हापसा येथील खोर्ली-सतीगणवाडी परिसरात खळबळ उडाली.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: क्षुल्लक वादातून दोन शेजारील कुटुंबांमध्ये झालेल्या संघर्षाने, म्हापसा येथील खोर्ली-सतीगणवाडी परिसरात खळबळ उडाली. लहान मुलांच्या खेळावरून सुरू झालेल्या एका किरकोळ वादाचे रूपांतर गुरुवारी (ता.७) रात्री मोठ्या हाणामारीत झाले, ज्यामध्ये एका ४१ वर्षीय व्यक्तीला गंभीर दुखापत झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी मैदानात लहान शाळकरी मुले खेळत असताना त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. मात्र, हा वाद केवळ मुलांपुरता मर्यादित राहिला नाही. मुलांच्या भांडणात दोन्ही घरातील महिलांनी उडी घेतल्याने त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. दुपारच्या वेळी वातावरण काहीसे शांत झाल्यासारखे वाटत असले, तरी दोन्ही कुटुंबांमधील धुसफूस कायम होती.

याच वादाचा कथित वचपा काढण्यासाठी गुरुवारी सायंकाळी दोन्ही कुटुंबांतील पुरुष सदस्य आमनेसामने आले. शाब्दिक वादाचे रूपांतर काही वेळातच शारीरिक हल्ल्यात झाले.सतीगणवाडी, खोर्ली येथील रहिवासी असलेल्या ६१ वर्षीय रुक्मिणी गंगाधर गडमे यांनी म्हापसा पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे शेजारी इमाम हुसेन ऊर्फ राजा जमीर शिकारपूर आणि यासीन जमीर शिकारपूर यांनी पूर्ववैमनस्यातून रुक्मिणी आणि त्यांचा मुलगा बसुराज गडमे (४१) यांना अश्लील शिविगाळ केली

.एवढ्यावरच न थांबता, दोन्ही संशयितांनी फिर्यादीच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यांनी लाकडी दंडुक्याने बसुराज यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात बसुराज यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. संशयितांनी यावेळी माय-लेकांना जीवे मारण्याची धमकीही दिली.

संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद

जखमी बसुराज यांना म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची दखल घेत म्हापसा पोलिसांनी संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५२, ३३२, ३५१(३), ११८(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंद केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT