गोवा

Land Fraud: बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडपण्याचा प्रकार! खोर्जुवे येथील घटना, दोघांना अटक

Mapusa land fraud case: खोर्जुवे येथील मयत अनंत कामत यांचे बनावट मृत्युपत्र व दस्तावेज तयार करणे, तसेच वारसदारांचा विश्वासघात करून फिर्यादींची जमीन कट रचून हडप केल्याप्रकरणातील दोघांना म्हापसा पोलिसांनी अटक केली.

Sameer Amunekar

म्हापसा : खोर्जुवे येथील मयत अनंत कामत यांचे बनावट मृत्युपत्र व दस्तावेज तयार करणे, तसेच वारसदारांचा विश्वासघात करून फिर्यादींची जमीन कट रचून हडप केल्याप्रकरणातील दोघांना म्हापसा पोलिसांनी अटक केली. देविदास पणजीकर व वामन पोळे अशी संशयितांची नावे आहेत.

याप्रकरणी रिचा शिरोडकर (रा. पत्रादेवी- तोरसे), शैलेश महांबरे (पर्वरी), राजेश शिरोडकर, रिया शिरोडकर, रूपेश शिरोडकर, नीलेश शिरोडकर, नेहा शिरोडकर, (तोरसे), राधाकृष्ण शेट्ये, शुभांगी शेट्ये (रा. तोरसे), विजय मंत्री, विजया मंत्री (रा. आरवली- सिंधुदुर्ग), वामन महांबरे, स्मिता महांबरे (साळगाव), प्रिया पै, कृष्णा पै (माशेल), संध्या महांबरे, सुगंधा महांबरे (पर्वरी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

या तक्रारीच्या आधारे म्हापसा पोलिसांनी गेल्या मार्च २०२५ मध्ये संशयित वामन पोळे, देविदास पणजीकर, श्रीमती सुहासिनी पडवळ, प्रकाश महांबरे, विशांत कामत यांच्याविरोधात भान्यासंच्या ३१९(२), ३३६(३), ३३८, ३४०(२) व ३१८(४) कलमान्वये गुन्हा नोंद केला होता.

बनावट मृत्युपत्र

हा जमीन हडप प्रकरणाचा प्रकार नोव्हेंबर २०२४ पूर्वी घडलेला. फिर्यादींचे वारसदार असलेले पोडवाळ- खोर्जुवे येथील स्व. अनंत कामत यांचे मे २०२१ मध्ये तर त्यांची पत्नी प्रभावती अनंत कामत यांचे जून २००९ मध्ये निधन झाले होते.

या मयत दाम्पत्याला मूलबाळ नव्हती. तसेच अनंत कामत यांच्या अविवाहित भावाचे देखील निधन झाले आहे. तर त्यांच्या तीन बहिणी या विवाहित आहेत. मयत कामत दाम्पत्याने आपल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेसंबंधीचे मृत्युपत्र तयार केले नव्हते.

तरीही संशयितांनी मयत अनंत कामत यांचे बनावट मृत्युपत्र आणि बोगस दस्तावेज तयार करून सर्वे क्रमांक ५२/०, ५१/३, ५०/७, १००/७, १००/१, ५३/८, ५५/८, ५५/९, २८/१(पार्ट), १४०/१(पार्ट) मधील हजारो चौ. मीटर जमिनीचे म्युटेशन करून ही जमीन हिसकावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट जगतात खळबळ! रोहित-विराटच्या निवृत्तीचा 'डाव' गंभीरने रचला? पुजारानंतर आणखी एका खेळाडूचा 'हल्लाबोल'

Goa Politics: खरी कुजबुज; 'त्या' भावी नगरसेवकांना हवाय युरीचा आशीर्वाद!

Goa Live News: बोणबाग बेतोडावासीयांचा इशारा! 'शिवाजी नगर'साठी नवी पाईपलाईन बसवण्याचे काम रोखणार

IFFI Goa 2025: इफ्फीच्या उद्‍घाटनाच्या चित्रपटाचे सिनेकर्मींना आमंत्रण का नाही? 'फिल्म मेकर्स'चा सवाल; मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

Goa Crime: दक्षिण गोव्‍यात सात दिवसांत चार अल्‍पवयीनांची अपहरणे, एका प्रकरणाचा छडा; तीन तपासाविना प्रलंबित

SCROLL FOR NEXT