म्हापसा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी म्हापसा मासळी मार्केटला अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मासळी विक्रेत्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या.
मार्केटमधील अस्वच्छता, पाण्याची टंचाई आणि पंख्यांचा अभाव यांसारख्या गैरसोयींकडे विक्रेत्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. या पाहणीनंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मार्केटच्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील मोकळ्या जागेचा प्रशासकीय कामांसाठी आणि विक्रेत्यांच्या सुविधेसाठी योग्य वापर केला जाईल. तसेच, विक्रेत्यांची गैरसोय लक्षात घेऊन या आठवडाभरात मार्केटमध्ये बंद असलेले पंखे सुरू करणे व पाण्यासाठी नळांची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विक्रेत्यांच्या प्रमुख मागण्या
मार्केटमध्ये पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी.
बंद असलेले पंखे तातडीने सुरू करावेत.
मार्केटमधील अस्वच्छतेची समस्या दूर करावी.
दुसऱ्या मजल्यावरील मोकळ्या जागेचा योग्य वापर करावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.