Goa Road Accidents: गोव्यात रस्तेअपघातांचा वेग वाढला; 280 दिवसांत 204 बळी, मागील वर्षाच्या तुलनेत 10 ने अधिक

Goa Road Safety: राज्यात रस्तासुरक्षा सप्ताह सुरू असतानाच अपघातांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे.
Goa Road Safety
Goa Road AccidentsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: राज्यात रस्तासुरक्षा सप्ताह सुरू असतानाच अपघातांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. यंदा १ जानेवारी ते ७ ऑक्टोबर या २८० दिवसांत राज्‍यात १९४ जीवघेणे अपघात घडले असून २०४ जणांचा बळी गेला आहे.

मागील वर्षी याच कालावधीत १७८ जीवघेण्या अपघातांत १९४ जणांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच यंदा बळींची संख्या १० ने वाढली आहे. अपघातांवर नियंत्रण आणण्‍यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी यंदा अपघात आणि बळींची संख्या वाढली आहे. २०२५ या संपूर्ण वर्षात राज्यात २६९ जणांचा रस्‍तेअपघातांत मृत्यू झाला होता. यंदाची अपघातांची गती पाहता हा आकडा ओलांडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वाहनांची वाढती संख्या आणि अनियंत्रित वाहतूक ही अपघातवाढीची प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जाते.

Goa Road Safety
Goa Politics: काँग्रेस-गोवा फॉरवर्ड पुन्हा जवळ येणार? सरदेसाईंच्या नव्या पवित्र्याने दक्षिण गोव्याचे राजकीय गणित बदलले

वाहतूक पोलिसांच्या ३ ऑक्टोबरपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, यंदा राज्यात १९८५ अपघात नोंदले गेले असून मागील वर्षी ही संख्या १७३३ होती. जीवघेण्या अपघातांची संख्या यंदा १९२, तर बळींची संख्या २०१ झाली आहे. मागील वर्षी हे प्रमाण अनुक्रमे १८५ आणि १९१ होते.

गंभीर अपघातांतही ३७ ने वाढ झाली आहे. मागील वर्षी १६८ गंभीर अपघातांत २१९ जण जखमी झाले होते; यंदा २०५ अपघातांत २५६ जण गंभीर जखमी झाले. किरकोळ अपघात ३२५ वरून ४४२, तर जखमींची संख्या ५२५ वरून ६८६ झाली आहे. कोणी जखमी न झालेल्या अपघातांची संख्याही १०५५ वरून ११४६ झाली आहे.

गंभीर जखमींची संख्याही वाढली

मागील वर्षी ३ ऑक्टोबरपर्यंत १६८ गंभीर अपघातांत २१९ जण जखमी झाले होते. यंदा २०५ गंभीर अपघातांत २५६ जण जखमी झाले. गंभीर जखमींच्या संख्येतही ३७ ने वाढ झाली.

Goa Road Safety
BJP Goa: 'सेवा ज्योती'ने दाखवली भाजपची ताकद; CM सावंत-नाईकांसह मंत्री, आमदार रस्त्यावर, 4 महिन्यांवरच्या निवडणुकीसाठी शक्तीप्रदर्शन

यंदा २५२ अपघात वाढले

३ ऑक्टोबरपर्यंत यंदा राज्‍यात १९८५ अपघात घडले. मागील वर्षी याच कालावधीत १७३३ अपघात झाले होते. म्हणजेच यंदा अपघातांच्या संख्येत २५२ ने वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com