Sewage Water Dainik Gomantak
गोवा

Mapusa Fish Market: नागरिकांच्या आरोग्याशी खेळ! म्हापसा मासळी मार्केटचे सांडपाणी नाल्यातून थेट नदीत; प्रदूषणात होतेय वाढ

Mapusa Fish Market Pollution: २०१७ मध्ये मासळी व मांस संकुलासाठी छोटा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्याचा प्रस्ताव पालिकेने ठेवला होता. मात्र, प्रकल्पाला विलंब झाला.

Sameer Panditrao

म्हापसा: येथील मासळी मार्केट इमारत आजही आरोग्य विभागाच्या परवानगीशिवाय सुरू आहे. सध्या या इमारतीला सांडपाणी प्रक्रिया करण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने या संकुलातील सांडपाणी थेट सार्वजनिक नाल्यात सोडले जात आहे. परिणामी, प्रदूषणात भर पडत आहे.

कारण हे सांडपाणी पुढे म्हापसा तार नदीत जाऊन मिसळते. या मार्केटमधून तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक ४० केएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला अद्याप गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (जीएसपीसीबी) मंजुरी मिळालेली नाही. परिणामी, अद्याप मासळी मार्केट या परवानगीशिवाय सुरू आहे. यासंदर्भात एका स्थानिकाने आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार या मासळी मार्केटची पाहणी करण्यात आली होती.

या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामुळे म्हापसा मासळी व मांस मार्केट संकुलातून सांडपाणी सोडण्याच्या दीर्घकालीन समस्येचे निराकरण होण्याची अपेक्षा आहे. सध्या या मासळी प्रकल्पातील सांडपाणी हे सार्वजनिक नाल्यांमध्ये सोडले जात आहे, जे अखेर म्हापसा तार नदीत वाहून जाते. परिणामी, प्रदूषणात भर पडत आहे.

दरम्यान, २०१७ मध्ये मासळी व मांस संकुलासाठी छोटा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्याचा प्रस्ताव पालिकेने ठेवला होता. मात्र, प्रकल्पाला विलंब झाला आणि अखेर फेब्रुवारी २०२४ मध्ये पायाभरणी करण्यात आली. पुण्यातील एका कंपनीला देण्यात आलेल्या या प्रकल्पाची किंमत ६०.६१ लाख रुपये असल्याचा अंदाज आहे.

ही मासळी इमारत तीन मजली असून, जवळपास २५० पेक्षा अधिक मासळी विक्रेते येथे व्यवसाय करतात. तसेच पहिल्या मजल्यावर चिकन तसेच मटण विक्रीची दुकाने कार्यरत आहेत.

मासळी मार्केटकडे परवानेच नाहीत

या मासळी मार्केटकडे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, अन्न आणि औषध प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून आवश्यक असलेले परवानेच नाहीत. अलीकडेच आलेल्या तक्रारीच्या आधारे म्हापसा नागरी आरोग्य केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेसोबत संयुक्तपणे मासळी मार्केट संकुलाची पाहणी केली असाता या ठिकाणी आवश्यक स्वच्छतेचा प्रकर्षाने अभाव असल्याचे निर्दशनास आले. या मासळी मार्केटमधील विक्रेत्यांना आरोग्य विभागाकडून परवानगी मिळालेली नाही. मात्र, त्यांना म्हापसा पालिकेकडून व्यापार परवाने मिळाले आहेत.

‘प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मंजुरीची प्रतीक्षा’

म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांनी सांगितले की, ४० केएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केल्या जातील. ज्यासाठी आम्ही आधीच अर्ज केला आहे. मंडळाकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ईटीपीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, आवश्यक मंजुरीअभावी त्याचे कामकाज प्रलंबित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT