Mapusa Municipal Market : म्हापशात भिकाऱ्यांमध्ये वाढ; समस्या सोडवण्याची मागणी

Mapusa Municipal Market : व्यापाऱ्यांनी केली पोलिसांशी चर्चा
Mapusa Municipal Market
Mapusa Municipal Market Danik Gomantak

म्हापसा पालिका बाजारपेठेमध्ये भिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. या भिकाऱ्यांमुळे दुकानदारांबरोबरच ग्राहकांनाही त्रास होत आहे. लहान लहान मुले ग्राहकांच्या मागून फिरत असल्यामुळे ग्राहकांना खरेदी करणे मुश्कील होते.

म्हापसा पालिका बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांना अनेक समस्या सतावत आहेत. यासंदर्भात बाजारपेठेतील दुकानदारांनी म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली म्हापसा पोलिस स्थानकामध्ये जाऊन पोलिस उपअधीक्षक संदेश चोडणकर व निरीक्षक निखिल पालेकर यांच्याशी शनिवार, २९ रोजी दुपारी चर्चा केली.

पावसाच्या दिवसांमध्ये चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे त्यासाठी म्हापसा पोलिसांची गस्त पालिका बाजारपेठेमध्ये रात्रीच्या वेळी वाढवणे गरजेचे असल्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली. तसेच पालिकेने घातलेले सीसीटीव्ही व्यवस्थित चालत नसल्याने अनेक व्यापाऱ्यांना त्याचाही त्रास उद्‌भवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पालिका बाजारपेठेमध्ये काही ठिकाणी काळोखाचे साम्राज्य पसरल्याने काळोखाचा फायदा घेऊन चोरटे चोरी करण्यास पुढे येत असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.

सर्व समस्या पोलिस उपअधीक्षक संदेश चोडणकर व पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांनी ऐकून घेतल्या. या व्यापाऱ्यांना पोलिस उपअधीक्षक संदेश चोडणकर आणि निरीक्षक निखिल पालेकर यांनी सांगितले की, बाजारात समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही पोलिसांची एक सल्लागार समिती काढणार आहोत आणि ही सल्लागार समिती प्रत्येक दुकानांच्या मालकांना भेटून त्यांचे नंबर व इतर माहिती नोंद करणार आहेत.

कामगारांची योग्य माहिती द्यावी

म्हापसा पालिका बाजारपेठेमधील काळोख आणि चोऱ्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आम्ही म्हापसा नगरपालिकेला पत्र पाठवून बाजारपेठेमध्ये आवश्‍यक ठिकाणी वीजदिवे लावण्याची मागणी करणार आहोत.

त्याचप्रमाणे ज्या-ज्या व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांमध्ये कामगार ठेवलेले आहेत त्या कामगारांची योग्य माहिती पोलिस ठाण्यांमध्ये फॉर्म भरून द्यावी आणि त्यांचा फोटोही द्यावा. कारण अघटित घटना घडल्या तर त्यांना पकडण्यास सोयीचे होईल, असेही पोलिसांनी सांगितले.

१०० पोलिसांची तुकडी सज्ज

प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. म्हापसा पोलिसांकडून म्हापसा, हणजूण व कोलवाळ या भागांमध्ये सुमारे १०० पोलिसांची एक तुकडी बंदोबस्त करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे.

यामध्ये काही पोलिस उपनिरीक्षक, साहाय्यक उपनिरीक्षक हवालदार व कॉन्स्टेबल हे पोलिस स्थानकाच्या भागांमध्ये दिवसा व रात्री फिरून पाहणी करतील, असे पोलिसांनी सांगितले.

Mapusa Municipal Market
Dr N Kalaiselvi यांची CSIR आणि DSIR च्या महासंचालक पदी नियुक्ती; प्रथमच एका महिलेला संधी

संबंधितांना पकडावे

जर कोणी गाडीमध्ये घालून भिकाऱ्यांना आणून म्हापसा बाजारपेठेमध्ये सोडत असल्याचे दिसल्यास व्यापारी किंवा इतर लोकांनी पोलिसांना ताबडतोब कळवावे किंवा तेथील काही लोकांनी एकत्र जमा होऊन संबंधितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यावे, असेही पोलिसांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com