Mapusa ambulance theft Dainik Gomantak
गोवा

Mapusa: रूग्णवाहिकाच पळवली, संशयित आरोपी निघाला मनोरुग्ण! म्हापसा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Mapusa ambulance theft: धुळेर येथील मेसर्स शेटये व्हिजन हॉस्पिटलची रूग्णवाहिका चोरून नेल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी प्रदीप देवू खलप (रा. पीर्ण, बार्देश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा : धुळेर येथील मेसर्स शेटये व्हिजन हॉस्पिटलची रूग्णवाहिका चोरून नेल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी प्रदीप देवू खलप (रा. पीर्ण, बार्देश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयित सध्या मनोरुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही घटना गुरुवारी (ता. ११) पहाटे सुमारे ५.५० वाजता घडली. चोरीस गेलेल्या जीए-०३-एएच-४२५० क्रमांकाच्या मारुती इको रूग्णवाहिकेची किंमत सुमारे १० लाख रुपये आहे. याप्रकरणी हॉस्पिटलचे प्रशासक इंतेखालो अब्बास शेख यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

हॉस्पिटलच्या इमारतीच्या तळमजल्यावर रूग्णवाहिका पार्क करण्यात आली होती. वाहन चालकाने रूग्णवाहिकेची चावी आतच ठेवली असल्याचा फायदा घेत संशयिताने वाहन सुरू करून तेथून पळ काढला.

संशयित यापूर्वी एका खासगी हॉस्पिटलमध्ये वाहन चालक म्हणून कार्यरत होता. रूग्णवाहिका घेऊन संशयित थेट बांबोळी येथील मनोरुग्णालयात गेला. त्यानंतर पुन्हा तीच रूग्णवाहिका घेऊन तो पीर्ण येथील घरी जात असताना रेवोडा येथे म्हापसा पोलिसांनी वाहन अडवून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत संशयित मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Supply Shortage: 24 तास पाण्याचं आश्वासन हवेत विरलं! सासष्टी तालुक्यात तक्रारींचा पाऊस, नागरिक पाण्यासाठी व्याकूळ

रणवीरची अ‍ॅक्शन अन् मोदींचा स्वॅग! 'धुरंधर 2' मधील पंतप्रधानांच्या एन्ट्रीवर चित्रपटगृहात जल्लोष अन् टाळ्यांचा कडकडाट VIDEO

Viral Video: 'हे इराण-इस्रायल युद्ध नाही तर...', पंजाबी फॅमिलीचा फूल टू ड्रामा, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; काय घडलं नेमकं?

Goa Drug Case: मोठा गाजावाजा, पण पुरावा शून्य! 43 कोटींचे ड्रग्ज रॅकेट हवेत विरले; पुराव्याअभावी वास्कोतील वाडेकर दांपत्यासह चौघांची निर्दोष मुक्तता

Bicholim Crime: डिचोलीतील 'त्या' अमानुष हत्यांनी हादरला 'गोवा'! 10 महिन्यात 4 निर्दयी खून; दोन चिमुकले आणि दोन महिलांचे बळी

SCROLL FOR NEXT