Mumbai's sessions court verdict, sending obscene messages to fiancee is not a crime Dainik Gomantak
गोवा

Mapusa Crime: पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी

म्हापसा येथे नवीन बसस्थानकावर घडला प्रकार

दैनिक गोमन्तक

म्हापसा येथील नवीन बसस्थानकावर जीवघेणा हल्ला केल्याने दोघे जखमी झाल्याची घटना दिनांक 28 ऑक्टोबर रोजी घडली. चंद्रकांत शिरोडकर व पुत्र ब्रिजेश शिरोडकर हे पिता-पुत्र म्हापसा येथील बसस्थानकावर येत असताना त्यांच्यावर सुरीहल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी दोघा संशयितांना आज न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

( Mapusa court remands 5 days police custody to 2 persons for murder attempt )

मिळालेल्या माहिती नुसार ही घटना 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास घडली. जखमी चंद्रकांत शिरोडकर व पुत्र ब्रिजेश शिरोडकर हे आपल्या पर्यटक टॅक्सीतून म्हापसा येथे नवीन कदंब बसस्थानकावर पर्यटकांना सोडण्यासाठी आले होते. यावेळी संशयितांनी अचानक आपली दुचाकी शिरोडकर पिता-पुत्राच्या कारसमोर घेतली. त्यामुळे कारची धडक या दुचाकीला बसली.

यावेळी संशयितांनी त्यांना शिवीगाळ करत नुकसान भरपाईची मागणी केली व समीर पेडणेकर याने ब्रिजेश शिरोडकर याच्यावर सुरीहल्ला केला. त्याच्या छातीवर व तोंडावर सुऱ्‍याचे घाव पडले आहेत. तर मुलाला वाचविण्यासाठी आलेल्या चंद्रकांत शिरोडकर यांच्या पाठीवरही संशयितांनी सुऱ्याचे वार केले. या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, पाच दिवसानंतर पुढील सुनावणी पार पडणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT