Court Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: मद्यधुंद चालकाला म्हापसा कोर्टाचा दणका; सुनावली 'एवढ्या' दिवसांची कोठडी!

Mapusa Court: मद्यधुंद होऊन वाहन चालविल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी किश्‍ना राम या चालकाविरुद्ध कारवाई केली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

मद्यधुंद होऊन वाहन चालविल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी किश्‍ना राम या चालकाविरुद्ध कारवाई केली होती. म्हापसा न्यायालयाने त्याला पाच दिवसांचा तुरुंगवास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.

पोलिसांनी केलेल्या अल्कोमीटर चाचणीत त्याने ४०९.३ मिलिग्रॅम प्रति १०० मिलि. मद्य प्राशन केल्याचे आढळून आले होते. त्याने केलेले हे मद्य मोठ्या प्रमाणात असल्याने वाहनावर नियंत्रण सुटून अपघाताला कारणीभूत ठरू शकते. त्याचा परवाना रद्द करण्यासाठी शिफारस करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

तीन इमारत - पर्वरी येथील जंक्शनवर बुधवारी रात्री पर्वरी पोलिसांनी नाकाबंदी करून वाहन चालकांची मद्य तपासणी सुरू केली होती. रात्री साडेअकराच्या सुमारास एका मालवाहू चालकाची मद्य तपासणी करण्यात आली. त्याच्या तोंडाला मद्याचा वास येत होता. तो बोलण्याच्या स्थितीतही नव्हता. त्याची अल्कोमीटर चाचणी करण्यात आली तेव्हा त्याने घेतलेल्या मद्याचे प्रमाण प्रमाणापेक्षा १२ पटीने अधिक होते. पोलिसांनी वाहन जप्त करत त्याला पोलिसात आणले. त्यानंतर त्याच्याविरुद्ध अहवाल तयार करून शिक्षेसाठी न्यायालयात पाठविला. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्याला तुरुंगात पाठवण्याबरोबरच दंडात्मक कारवाई केली. त्याने दंडात्मक १० हजाराची रक्कम न भरल्यास आणखी दहा दिवस तुरुंग भोगावा लागेल असे आदेशात स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayem Lake: मये तलावाला लवकरच येणार 'अच्छे दिन', जोडरस्त्याच्या कामाचा प्रारंभ; नोव्हेंबरपासून पर्यटनाला चालना

Fatorda Stadium: स्टेडियमसाठी जागा दिलेल्यांना मिळणार घराची मालकी, मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन; विजय सरदेसाईंनी घडवून आणली कुटुंबीयांची भेट

Horoscope: पैशांचा पाऊस पडणार! गुरुवारी अचानक होणार धनलाभ, 'या' 3 राशींचे नशीब चमकेल आणि आर्थिक स्थिती होईल मजबूत

Bihar Assembly Election: प्रशांत किशोर निवडणूक लढणार नाहीत, पक्षसंघटनात्मक कामासाठी निर्णय घेतल्याचा दावा

Davorlim Panchayat: दवर्ली सरपंच, उपसरपंचांची निवड लांबणीवर; पंचसदस्यांत वादविवाद, गोंधळानंतर प्रक्रिया ढकलली पुढे

SCROLL FOR NEXT