Mapusa Corporation  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Corporation Budget : म्हापसा पालिकेचे अंदाजपत्रक अडले; आचारसंहितेचा फटका

Mapusa Corporation Budget : पालिकेची निवडणूक आयोगाला विनंती

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa Corporation Budget :

म्हापसा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे म्हापसा पालिकेला आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक संमत करण्यास मिळाले नाही. परिणामी, नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे अंदाजपत्रक मांडण्यासाठी पत्राद्वारे परवानगी मागितली आहे.

म्हापसा पालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकावर चर्चा करून त्याला मंजुरी देण्यासाठी १८ मार्च रोजी, सकाळी पालिका मंडळाची विशेष बैठक बोलावली होती, परंती बैठक रद्द करावी लागली.

लोकसभा आचारसंहितेमुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे नगराध्यक्षा डॉ. नूतन बिचोलकर यांनी सांगितले.

स्थायी समितीकडून मंजुरी

उपलब्ध माहितीनुसार, पालिकेने अंदाजपत्रकाचा प्रस्ताव तयार केला असून त्याला स्थायी समितीकडून मंजुरी मिळाली आहे. मात्र, बैठकीपूर्वीच आचारसंहिता लागल्याने या अंदाजपत्रकाला पालिका मंडळाची मंजुरी मिळू शकली नाही. सोमवारी आयोजित विशेष बैठक रद्द करावी लागली.

गेल्या आठवड्यात नगराध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर लगेच अर्थसंकल्पाची तयारी सुरू करण्यासाठी पावले उचलली. परंतु आचारसंहिता लागल्यामुळे हे काम रखडले. याविषयी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून अंदाजपत्रक मांडण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.

- डॉ. नूतन बिचोलकर, नगराध्यक्षा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT