म्हापसा : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. अशातच म्हापसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी ८.४५च्या सुमारास शेळपे येथे रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी ‘धूम स्टाईल’ लांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेच्या प्रतिकारामुळे त्यांचा अंदाज चुकला. दोघांना मेरशी येथे पकडण्यात आले.
यावेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु, पीडितेने प्रतिकार करीत मंगळसूत्र हाताने घट्ट पकडून ठेवले. त्यामुळे चोरीचा बेत फासला. या प्रकारामुळे संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला.
या चोरट्यांना मेरशी भागात पडकण्यात जुने गोवा पोलिसांना यश आले. ही सऱ्हाईत टोळी असावी, अशी शक्यता असून, त्या दृष्टीने तपास सुरू आहे. गोव्यात सोन्याचे दागिने हिसकावून ते कर्नाटक वा महाराष्ट्रात विकण्यात येतात, अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. अशा सोनारांचाही शोध घेतला जाणार आहे.
आणखीही काही गुन्हे?
रस्त्यातून फिरताना महिलांना लक्ष्य करून दागिने हिसकावण्याचे प्रकार अलिकडच्या काळात वाढले आहेत. मेरशी येथे पकडण्यात आलेल्या दोघांकडून आणखीही काही गुन्ह्यांची उकल होऊ शकते.
काल सकाळी तोरसे येथे असाच प्रकार घडला. महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या एका चोरट्याला स्थानिक युवकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे मोपा पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली.
चोरटा हा ‘आआरबी’मधील निलंबित पोलिस निघाला. त्याला बडतर्फ करण्यासाठी हालचाल सुरू झाली आहे. ज्यांनी रक्षण करायचे अशा व्यक्तीने चोरी केल्याने नागरिकांमध्ये चितेंचे वातावरण आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.