Mapusa Building Slab Collapse Dainik Gomantak
गोवा

Mapusa Building Slab Collapse: बाल्कनीचा स्लॅब कोसळून सहा कामगार जखमी; डांगी कॉलनी, म्हापशातील घटना

Six Workers Injured Mapusa: म्हापसा येथील डांगी कॉलनी भागात रविवारी (ता. १९) दुपारी बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: येथील डांगी कॉलनी भागात रविवारी (ता. १९) दुपारी बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या बाल्कनीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली. या अपघातात सहा कामगार किरकोळ जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. इमारतीचे काम सुरू असताना अचानक बाल्कनीच्या स्लॅबचा एक भाग कोसळला. त्यामुळे तेथे काम करत असलेले सहा मजूर जखमी झाले.

दुर्घटनेनंतर तातडीने सर्व जखमी कामगारांना उपचारासाठी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सुदैवाने, सर्वांची दुखापत किरकोळ असल्याने प्राथमिक उपचारांनंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

म्हापसा पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, स्लॅब नेमका कोणत्या कारणामुळे कोसळला, याचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT