VIDEO: 3 तास खुर्चीला बांधून मारहाण, कान खेचल्याने कानाचा पडदा सुजला; दिल्लीतील प्लेस्कूलमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा छळ

Delhi Playschool Child Abuse Jaffrabad: देशाची राजधानी दिल्लीतील जाफराबाद परिसरात एका प्लेस्कूलमधून अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी घटना समोर आली.
Delhi Playschool Child Abuse Jaffrabad
Delhi Playschool Child Abuse JaffrabadDainik Gomantak
Published on
Updated on

Delhi Playschool Child Abuse Jaffrabad: देशाची राजधानी दिल्लीतील जाफराबाद परिसरात एका प्लेस्कूलमधून अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी घटना समोर आली. एका 3 वर्षांच्या चिमुकल्याला नियंत्रणात ठेवण्याच्या नावाखाली त्याला तब्बल तीन तास खुर्चीला पट्ट्याने बांधून ठेवण्यात आले, इतकेच नव्हे तर त्याला मारहाण करुन त्याचे कान क्रूरपणे खेचण्यात आले. या अमानुष कृत्यामुळे बालकाच्या डोळ्यांना आणि कानाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्या कानाच्या पडद्याजवळ मोठी सूज आली. या घटनेचे थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

ही संतापजनक घटना 18 ऑगस्ट रोजी घडली, जेव्हा मुलगा शाळेतून घरी परतला तेव्हा त्याचे डोळे आणि कान सुजलेले होते, तसेच त्याच्या उलट्याही होत होत्या. घाबरलेल्या पालकांनी त्याला तातडीने डॉक्टरांकडे नेले. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले की, मुलाच्या दोन्ही कानांच्या पडद्याजवळ गंभीर सूज असून, ही दुखापत मारहाण केल्यामुळे आणि कान जोरात ओढल्यामुळे झाली आहे. यानंतर डॉक्टरांनी सीटी स्कॅन आणि सीबीसी चाचण्या करण्याचा सल्ला दिला. मुलाची अवस्था पाहून पित्याने प्लेस्कूलमध्ये जाऊन प्रशासनाकडे विचारणा केली, मात्र कर्मचाऱ्यांनी मारहाण नाकारली.

Delhi Playschool Child Abuse Jaffrabad
Delhi Metro Crime: प्रवाशांची गर्दी अन् चोरट्याचा प्लॅन तयार! दिल्ली मेट्रोमध्ये बिनधास्त चोरी; कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ चर्चेत

सत्य शोधण्यासाठी पालकांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. आरोप आहे की, शाळा प्रशासनाने फुटेज दाखवण्यासाठी 1500 रुपयांची मागणी केली. पालकांनी क्लासरुमचे फुटेज पाहण्याचा हट्ट धरल्यानंतर 18 ऑगस्टचे भयंकर दृश्य समोर आले. व्हिडिओमध्ये निष्पाप बालकाला बेल्टने तब्बल 3 तास खुर्चीला बांधून ठेवल्याचे आणि तो सुटण्याचा प्रयत्न करत असताना त्याला चापट मारुन कान खेचल्याचे स्पष्ट दिसले. पुढे 16 आणि 17 ऑगस्टचे फुटेज पाहिले असता, त्या दिवशीही मुलासोबत असाच अमानुष व्यवहार करण्यात आल्याचे उघड झाले.

Delhi Playschool Child Abuse Jaffrabad
Delhi Crime: दिल्लीत माणुसकीला काळिमा; 70 वर्षांच्या अंध आणि मतिमंद वृद्धेवर विटेनं हल्ला करत बलात्काराचा प्रयत्न; 'नराधमाला तात्काळ फाशी द्या'

शाळा प्रशासनाने मुलगा हायपरॲक्टिव्ह असल्याचा दावा करत आपल्या कृत्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला, परंतु पालकांनी सवाल केला की जर काही वर्तणूकविषयक समस्या होती, तर कुटुंबाला आधी का कळवले नाही? पालकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी (Police) 28 ऑगस्ट रोजी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला. याप्रकरणी प्लेस्कूलमधील एका केअरटेकर महिलेला ताब्यात घेण्यात आले असून, शिक्षिका आणि इतर कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचा पोलीस तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com