Mapusa Bodgini Road Dainik Gomantak
गोवा

Mapusa: नवीन रस्त्यावर खासगी कंपनीकडून खोदकाम, संतप्त नागरिक रस्त्यावर; काम पडले बंद

Mapusa Bodgini Road: म्हापसा-बोडगिणी रस्त्यावर मंगळवारी रात्री उशिरा एका खासगी कंपनीकडून करण्यात येणारे अनधिकृत खोदकाम सतर्क रहिवाशांनी थांबवले.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: नुकत्याच डांबरीकरण झालेल्या म्हापसा-बोडगिणी रस्त्यावर मंगळवारी रात्री उशिरा एका खासगी कंपनीकडून करण्यात येणारे अनधिकृत खोदकाम सतर्क रहिवाशांनी थांबवले. हॉटमिक्सिंग आणि मिलिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेचच रस्ता खोदला जात असल्याने स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

भाजप युवा अध्यक्ष तुषार केरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांनी या प्रकाराचा निषेध करत संबंधित खासगी कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना आमदार जोशुआ डिसोझा यांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला.

जबाबदार व्यक्तींवर दंडात्मक कारवाईसह कडक कायदेशीर पावले उचलली जातील, असा इशारा त्यांनी दिला आहे. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास काही कामगार नवीन डांबरी रस्ता खोदत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. या नागरिकांनी घटनास्थळी जाऊन कामगारांकडे परवानगीबाबत विचारणा केली. तसेच याबाबत म्हापसा पोलिसांना माहिती देण्यात आली.

...तर भारी दंड

आमदार जोशुआ डिसोझा यांनी सांगितले की, त्यांनी पोलिसांना संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. म्हापसावासीयांनी चांगल्या रस्त्यांसाठी बराच काळ वाट पाहिली आहे. रस्ता तयार झाल्यानंतर तो पुन्हा खोदणे खपवून घेतले जाणार नाही. यापुढे हॉटमिक्सिंगनंतर खोदकाम करणाऱ्यांना भारी दंड सोसावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: लखनौ-आग्रा एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली डबल डेकर बस उलटली; 6 जणांचा मृत्यू, 19 जखमी

IPL Qualifier 1 Bengaluru vs Gujarat: गुजरातचं टेन्शन वाढलं! क्वालिफायर-1 पूर्वी RCB च्या संघात 'या' मॅचविनर खेळाडूची एन्ट्री; बंगळुरूला मोठा दिलासा

Horoscope: मंगळवारचा दिवस 'या' राशींसाठी ठरणार वरदान; बजरंगबलीच्या आशीर्वादाने उघडणार नशिबाचे टाळे! सर्व कामं होणार यशस्वी

Goa Politics: 'आरजी'मधील घडामोडी गोव्यातील परंपरेला धरूनच

पंधरा वर्षांनंतर राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण!

SCROLL FOR NEXT