Mapusa | Shri Dev Bodgeshwar Sansthan
Mapusa | Shri Dev Bodgeshwar Sansthan Dainik Gomantak
गोवा

Mapusa: बोडगेश्‍वर देवस्थान जत्रेसाठी लोटला महासागर

दैनिक गोमन्तक

Mapusa: म्हापसा येथील सुप्रसिद्ध व जागृत दैवत श्री देव बोडगेश्वर देवस्थानचा 88वा महान जत्रोत्सव काल हजारो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधींनिशी उत्साहात पार पडला. मुख्य जत्रोत्सवानिमित्त झालेल्या पूजेचे यजमानपद देवस्थान समितीचे उपाध्यक्ष श्रीराम शिंदे यांनी सपत्नीक भूषविले. दुपारी 12 वाजता श्रींसमोर पुरोहितांनी गाऱ्हाणे घातल्यानंतर या जत्रोत्सवाला सुरुवात झाली.

यावेळी म्हापसा परिसरातील विविध देवस्थाने, विविध संस्था, पोलीस, अग्नीशमन दल व पालिकेतर्फे देवाच्या चरणी फळांचा प्रसाद अर्पण करण्यात आला. विविध मान्यवरांसह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपसभापती जोशुआ डिसोझा, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार मायकल लोबो, आमदार डिलायला लोबो आदींनी श्रींचे दर्शन घेतले.

बुधवारी श्री देव बोडगेश्वराच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा ३०वा वर्धापनदिन महोत्सव साजरा झाला. त्यावेळी देवाला नवीन सोन्याचा दांडा अर्पण करण्यात आला. तर सायंकाळी सुवासिनींतर्फे दीपोत्सव साजरा करण्यात आला आणि रात्री दशावतारी नाट्यप्रयोग झाला. 

म्हापसा येथील देव बोडगेश्वराच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 30व्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी सायंकाळी आयोजित वेशभूषा स्पर्धेत म्हापशातील प्रांजल प्रवीण सातार्डेकर या मुलीने देव बोडगेश्वराचा पेहराव केला होता. तिचा हा पेहराव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

सकाळपासून भाविकांची रांगा

जत्रोत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी हजारो भाविकांनी श्रींचे देवदर्शन घेतले. देवस्थानाच्या बाहेर सकाळपासून भाविकांची रांग दिसत होती. यावेळी राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी देवस्थानात येऊन देवदर्शन घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT