Food Stall Raid At Mapusa
म्हापसा : येथील अलंकार थिएटर परिसरातील गोवा राज्य प्रदूषण मंडळाकडून आवश्यक परवाना न घेतलेल्या पाच खाद्यपदार्थ विक्री गाळे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशनानुसार मामलेदार कार्यालयाकडून सील करण्यात आले आहेत.
सील केलेल्या पाच आस्थापनांमध्ये मेसर्स फुड फुजन फास्ट फूड, मेसर्स असगर अली शेख, मेसर्स मामास् कोल्ड ड्रींक अॅण्ड फास्ट फूड, मेसर्स पापास् फूड कॉर्नर व मेसर्स केणी कोल्ड ड्रींक यांचा समावेश आहे.
काही महिन्यांपूर्वी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात म्हापसा शहरातील खाद्य विक्री विशेषतः फास्टफूड आणि रेस्टॉरन्ट व्यवसायिकांनी मंडळाचा आवश्यक परवाना न घेता व्यवसाय चालवला असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार प्रदूषण मंडळाने संबंधित आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
तरीही मंडळाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे संबंधित आस्थापने बेकायदा ठरवून ती सील करण्याची कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांना मंडळाने दिले होते. नंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी बार्देश मामलेदारांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाचीकार्यवाही करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार मंगळवारी दुपारी मामलेदार कार्यालयामार्फत तलाठ्यांनी वरील सर्व आस्थापनांना नोटीस बजावत सील ठोकले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.