Mapusa Dainik Gomantak
गोवा

Mapusa: म्हापशात शासकीय इमारतीला ‘लिफ्ट’ नाही! 3 मजले चढून जाण्यात ज्येष्ठांचे होतायत हाल

प्रशासकीय इमारतीला मागील ३० वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला असला, तरी त्याला लिफ्ट नसल्याने लोकांना तीन मजली पायऱ्या चढून ये-जा करावी लागते.

Sameer Amunekar

म्हापसा: येथील प्रशासकीय इमारतीला मागील ३० वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला असला, तरी त्याला लिफ्ट नसल्याने लोकांना तीन मजली पायऱ्या चढून ये-जा करावी लागते. या इमारतीला लिफ्टसाठी तरतूद ठेवली होती. मात्र, प्रत्यक्षात ही लिफ्ट कार्यान्वित करण्यास प्रशासनाला अद्यापही यश आलेले नाही. यासंदर्भात माहिती घेतली असता, ही इमारत पाडली जाणार आहे एवढेच सांगितले जाते. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून हीच सबब लिफ्टबाबत विचारली असता दिली जाते. कारणे काहीही असली तरी सध्या लोकांची लिफ्टअभावी गैरसोय होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, येथील प्रशासकीय इमारतीला लिफ्ट नसल्याने या ठिकाणी शासकीय कामासाठी येणाऱ्या लोकांची गैरसोय होते. येथे मामलेदार कार्यालयासह टीसीपी, साबांखा, नागरी पुरवठा, जमीन सर्वेक्षण तसेच इतर महत्त्वाची कार्यालये आहेत. संपूर्ण बार्देश तालुक्याचा शासकीय कारभार येथूनच चालतो.

या इमारतीत महत्त्वपूर्ण शासकीय कारभार चालत असला तरी या इमारतीला लिफ्ट नसल्याने किंबहुना व्यवस्थित इमारतीचे नियोजन न केल्यानेच लिफ्टची तरतुद असूनही ती अस्तिवात आलेली नाही. त्यामुळे लोकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच या इमारतीची देखील दुर्दशा झालेली आहे. सरकारकडून या इमारतीची विशेष देखभाल झाली नसल्याने या स्थितीत दरवर्षी भर पडली आहे.

मध्यंतरी लिफ्टसाठी प्रयत्न झाले होते. मात्र, ते अपुरे पडले. येथील भूजल पातळी अधिक असल्याने देखील लिफ्टचे काम पुढे गेले नाही, तर दुसरीकडे लिफ्टमधून बाहेर पडणारा एक्झीट दरवाजा या नियोजित जागेत बसत नव्हता.

त्यामुळे हे काम पुढे गेले नाही असे देखील सांगितले जाते. परिणामी, तरतूद असूनही अन् जागा ठेवून देखील लिफ्ट अंमलात आली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे दूरदृष्टी किंवा इमारतीच्या आराखड्यातील तांत्रिक त्रुटीमुळे लिफ्ट शेवटपर्यंत अस्तिवात आलेली नाही.

म्हापसा शहरात नवीन आणि चांगल्या प्रकारे डिझाइन केलेले सरकारी संकुल ही काळाची गरज आहे. जर नवीन संकुल बांधले गेले, तर म्हापशातील इतर सर्व सरकारी कार्यालयेदेखील एकाच छताखाली आणता येतील. या संकुलात चांगले नियोजित पार्किंग क्षेत्र असू शकते आणि नागरिकांना सध्याच्या संकुलात तसेच म्हापशातील इतर सरकारी कार्यालयांमध्ये होणाऱ्या बेशिस्त पार्किंगचा त्रास टाळता येईल. विद्यमान शासकीय इमारतीत सुविधांचा अभाव असून महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना याचा जास्त त्रास होतो. - सितेश मोरे, समाज कार्यकर्ते, म्हापसा

‘नवी इमारतीत तरी ‘लिफ्ट’ची सोय करा’

ही इमारत पाडून या ठिकाणी दुसरी शासकीय इमारत उभारली जाणार आहे. तशी तयारी सरकार दरबारी सुरू आहे असे सांगितले जाते. विद्यमान शासकीय इमारतीच्या बाजूची जागा सरकारने घेण्याची प्रक्रिया चालविली आहे. त्यानंतर या ठिकाणी भव्य शासकीय प्रकल्प उभारण्याचा सरकारचा मानस आहे. अशावेळी किमान नवीन प्रकल्प उभारताना लिफ्टची बांधणी अन् इतर तांत्रिक गोष्टींचा अभ्यास करावा, अशी मागणी नागरिकांची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ration Card: गोव्यातील 350 हून अधिक रेशनकार्ड ‘सरेंडर’! उत्पन्न मर्यादेचा भंग; 103 नवीन कार्ड वितरित

Goa Education: गोवा शालेय परीक्षांबाबत मोठी अपडेट! 3री ते 8वी च्या प्रश्नपत्रिका दुसऱ्या राज्यातील एजन्सी काढणार

Goa Rain: ..बास बाबा आता! 6 दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी; मध्‍यम स्वरूपाचा पाऊस पडणार

Goa Coal Handling: दक्षिण गोव्यात ‘कोळसा’ वाढणार! सिमोईस यांची भीती; वास्को-होस्‍पेट रेल दुपदरीकरणाला विरोध कायम

Goa Live Updates: उगवे येथे गुलमोहराचे भलेमोठे झाड कोसळले

SCROLL FOR NEXT