Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: पठ्ठ्यानं हेलमेट सोबत घेतलं, पण डोक्यावर नाही घातलं; अन्...

टेम्पोरिक्षाची दुचाकीला धडक; सिरसई येथील घटना

Akshay Nirmale

Goa Accident: सिरसई येथील झारापकर पेट्रोलपंपाजवळ गुड्स कॅरिअर रिक्षा टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात शैलेश दिलीप नानोडकर (45, रा.नानोडा, डिचोली) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात बुधवारी (ता. ८) सकाळी 11.30 च्या सुमारास घडला. मृत दुचाकीस्वार हा अस्नोडाहून सिरसई येथे झारापकर पेट्रोलपंप येथे आपल्या जीए 07 एच 7370 या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून पेट्रोल घालण्यासाठी येत होता. तर विरोधी दिशेने येणाऱ्या एमएच 07 एजे 2958 क्रमांकाच्या अशोक लेयलँड गुड्स कॅरिअर टेम्पोरिक्षाने त्याला धडक दिली.

पेट्रोलपंपाजवळील उतरणीवर टेम्पोने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार शैलेश नानोडकर गंभीर जखमी झाले. त्यांचा जागीत मृत्यू झाला. नानोडकर यांच्याकडे हेल्मेट होते पण त्यांनी ते डोक्यावर घातले नव्हते.

या घटनेची माहिती मिळताच कोलवाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमीला म्हापसा इस्पितळात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. अपघाताचा पंचनामा पोलीस उपनिरीक्षक सुशांत सांगोडकर व हवालदार नरेंद्र शेटये यांनी केला.

पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन हाकून सदोष्य मनुष्यवधाच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवून अपघातग्रस्त टेम्पोरिक्षाचालक आकाश सुरेश नाईक (28, रा. सालईवाडी, सावंतवाडी) याला अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Codar IIT Project: ‘गोवा विकायला काढलाय’! आयआयटी आंदोलनात काँग्रेसची उडी; विरियातो उठवणार संसदेत आवाज

Goa Live Updates: कोंकणी प्रजेचो आवाज हरपला! बाबली नायक यांचे निधन

Adivasi Bhavan: आदिवासी भवनाचे काम 2 महिन्‍यांत सुरू करणार! तवडकरांची हमी; GSIDC कडून प्रक्रिया सुरू

Goa Politics: खरी कुजबुज; व्‍हेंझींना ‘त्‍या’ महिलेचा कळवळा नाही का?

ESG: गोवा मनोरंजन संस्थेचा नवीन गोंधळ! गाजलेल्या ‘जुझे’ फिल्मच्या टीमकडून पुरस्कार परत; वादग्रस्त अहवाल हटवला

SCROLL FOR NEXT