Goa Traffic Violation : वाहतूक पोलिसांची धडक कारवाई, महिन्याभरात 300 नोटीसा पाठवत वसूल केला 'इतक्या' लाखांचा दंड

एकूण दंड वसूल केला रु. 16,03,500/-
Traffic Rules Violation in Goa
Traffic Rules Violation in GoaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Traffic Violation गोव्यातील वाढत्या रस्ते अपघातांना आळा बसावा यासाठी वाहतूक पोलीस सक्रिय झाले असून वेगमर्यादेचे उल्लंघन करणारे, विना हेल्मेट प्रवास करणारे, सिग्नल नियम ना पाळणारे अशा सर्वांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. त्यासाठी गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलीस कार्यरत असून सोबतीला सीसीटीव्ही कॅमेरादेखील करडी नजर ठेऊन आहे.

या प्रकरणी म्हापसा एसडीपीओ जिवबा दळवी यांनी सविस्तर माहिती दिली. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हणजुण, म्हापसा, कोलवाळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद झाली आहे. हणजूण पोलीस स्टेशनमध्ये 1116 गुन्हे दाखल करण्यात आले असून दंडापोटी रु. 6,44,000/- जमा झाले आहेत.

तर म्हापसा पोलिस स्टेशनमध्ये 951 गुन्हे दाखल झाले असून दंडापोटी रु. 4,82,000/- जमा झाले आहेत. तर कोलवाळ पोलिस स्टेशनमध्ये 756 गुन्हे दाखल करण्यात आले असून दंडापोटी रु. 4,77,500/- जमा झाले आहेत.

Traffic Rules Violation in Goa
CM Pramod Sawant: लैंगिक अत्याचाराच्या कारणाविषयी मुख्यमंत्री स्पष्टच बोलले; वाचा सविस्तर...

तर सीसीटीव्ही आधारे हणजूण पोलिस स्टेशनने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 80 जणांना, म्हापसा पोलिस स्टेशनने 70 जणांना आणि कोलवळे पोलिस स्टेशनने 70 जणांना नोटिसा बजावल्या आहेत.

पोलिसांच्या अशा कडक कारवाईमुळे वाहनधारकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता वाहतुक नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता कमी झाली असल्याचे दळवी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com