Arrested Dainik Gomantak
गोवा

Crime News : आयटी अधिकारी असल्याचे भासवून व्यावसायिकाला ३० लाखांना लुबाडले; एका युवतीसह दोघांना अटक

Crime News : उपलब्ध माहितीनुसार, हा प्रकार ऑगस्ट २०२३ मध्ये घडला होता. तक्रारदाराच्या म्हापशातील बंगल्यावर काही संशयितांनी फिर्यादीस दिल्लीच्या आयटी खात्यातील अमली पदार्थ विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून त्यांना मारहाण केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Crime News :

म्हापसा, दिल्ली आयटी विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून एका व्यावसायिकाकडून ३० लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

निवेदिता शर्मा (वय २९, उत्तर प्रदेश) आणि भुवन अरोरा (वय ३५, उत्तराखंड) अशी संशयितांची नावे आहेत. तथापि, निवेदिता शर्मा या महिलेची जामिनावर सुटका झाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, हा प्रकार ऑगस्ट २०२३ मध्ये घडला होता. तक्रारदाराच्या म्हापशातील बंगल्यावर काही संशयितांनी फिर्यादीस दिल्लीच्या आयटी खात्यातील अमली पदार्थ विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून त्यांना मारहाण केली.

तसेच अमली पदार्थ प्रकरणात अटक करून बदनामी करू, असे धमकावत फिर्यादीकडून ३० लाख रुपयांची खंडणी उकळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT