post offices in goa Dainik Gomantak
गोवा

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Goa Post Office Issue: पोस्टातील अनेक सेवा चार दिवसांपासून ठप्प आहेत. मागील काही दिवसांपासून इंटरनेट सुविधा योग्य प्रकारे मिळत नसल्याचा परिणाम पोस्टाच्या कामावर होत आहे. राज्यासह देशभरातील पोस्टांतील इंटरनेट सेवेत बिघाड झाल्याने अनेक लोक कामानिमित्त पोस्ट कार्यालयात जाऊन पुन्हा माघारी परतत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Post Office Service Problems

पणजी: पोस्टातील अनेक सेवा चार दिवसांपासून ठप्प आहेत. मागील काही दिवसांपासून इंटरनेट सुविधा योग्य प्रकारे मिळत नसल्याचा परिणाम पोस्टाच्या कामावर होत आहे. राज्यासह देशभरातील पोस्टांतील इंटरनेट सेवेत बिघाड झाल्याने अनेक लोक कामानिमित्त पोस्ट कार्यालयात जाऊन पुन्हा माघारी परतत आहेत.

गोव्यातील पोस्ट कार्यालयांमध्ये इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या बीएसएलशी चर्चा केली असून नेमक्या कोणत्या कारणामुळे बिघाड झाला आहे याचा तपास सुरू असल्‍याचे पाटो पणजी येथील मुख्य कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. मध्यंतरी पोस्ट सेवेचे महत्त्व कमी झाले होते. पंरतु पोस्ट बॅंक झाल्याने तसेच या बॅंक खात्याद्वारे केंद्र सरकारच्या विविध सुविधा येथून मिळविता येत असल्याने पुन्हा पोस्टाला महत्त्व आले आहे. परंतु मागील चार दिवसांपासून ग्राहकांची गैरसोय होत आहे.

पत्रे पाठविणे, स्पीड पोस्ट तसेच इतर सेवा पोस्‍टातर्फे सुरळीतपणे सुरू आहेत. परंतु इंटरनेटमुळे जीवन बिमा काढणे तसेच मुख्य करून पोस्टाची बॅंकिंग सेवा बंद असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम पोस्टाच्या सेवेवर होत आहे. पोस्टाने बॅंकिंग सुविधा पुरविल्यापासून अनेक नागरिकांनी त्‍यास प्राधान्य देत मोठ्या प्रमामात खाती उघडली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी 3 राशींवर श्रीकृष्णाची विशेष कृपा; रखडलेली कामं मार्गी लागणार, सिंह-धनूसाठी सावधगिरीचा दिवस

Colvale Jail: कोलवाळ कारागृहातून 'सेटलमेंट'चा डाव? तारक आरोलकरांच्या कथित ऑडिओने खळबळ; न्यायालयात पेनड्राईव्ह सादर

ENG vs PAK: इंग्लंड दौऱ्यात पाकड्यांची नाचक्की! खेळाडूचा 'किंग चार्ल्स'ला भेटण्यास नकार; सर्फराज अहमदची हकालपट्टी

Viral Post: ना ऑफिसची कटकट, ना ट्रॅफिकचं टेन्शन! हिमाचल सोडून थेट गोव्याचा समुद्र गाठला; 'Work From Home' करणाऱ्या तरुणाची अनोखी कहाणी VIDEO

Goa Coastal Zone Management Plan: गोव्याचा सीआरझेड आराखडा तयार, पण अंतिम मंजुरी बाकी; महिनाभरात हरकती-सूचनांसाठी खुला होणार?

SCROLL FOR NEXT