Goa Election: राज्यात पक्षांतराचे डोहाळे
Goa Election: राज्यात पक्षांतराचे डोहाळे Dainik Gomantak
गोवा

Goa Election: राज्यात पक्षांतराचे डोहाळे

दैनिक गोमन्तक

2017 च्या विधानसभा (Assembly Election) निवडणुकीत गोव्यातील (Goa) 40 पैकी पर्वरी, सांगे व प्रियोळ या तीन मतदारसंघांत अपक्ष आमदार निवडून आले. यातील प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांना भाजपने पाठिंबा दिला होता. तर पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांना कॉंग्रेसने पाठिंबा दिला. सांगेचे आमदार प्रसाद गावकर मात्र भाजप व कॉंग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करून निवडून आले. खंवटे हे सलग दुसऱ्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. मात्र, यावेळी त्यांना आपली जागा असुरक्षित वाटत असल्याने ते इतर पक्षात प्रवेश करणार आहेत. तसे त्यांनी बोलूनही दाखवले आहे. (Many leaders have changed parties ahead of Goa elections)

दुसरीकडे सांगेचे आमदार गावकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे पक्के केले आहे. तिसरे अपक्ष आमदार गावडे हे भाजप सरकारात मंत्री आहेत. मागील निवडणुकीत भाजपने त्यांना पाठिंबा दिला होता. भाजपच्या बड्या नेत्यांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित असतात. जर मगोसोबत भाजपची युती झाली नाही तर तेही भाजपमध्ये दाखल होऊन निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी तसे यापूर्वीच बोलून दाखवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत अपक्ष आमदार निवडणुकीत दिसणार नाहीत. मात्र, निवडणुकीनंतर एखादा-दुसरा अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो, अशी वदंता आहे.

प्रियोळ मतदारसंघात आज बेरोजगारीचा मोठा प्रश्‍न आहे. मतदारसंघात वीज, पाणी पुरवठ्यासह अन्य समस्याही आहेत. एखादा विकासप्रकल्प साकारायचा म्हटले, तरी त्यावरून वाद उद्‍भवतात आणि मग विकासापासून वंचित राहावे लागते. आजवर राजकीय स्पर्धेतून या मतदारसंघाच्या विकासात अडथळा निर्माण झाला आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Babu Kavalekar) यांच्या पत्नी आणि भाजप महिला मोर्चाच्या राज्य कार्यकरिणीच्या उपाध्यक्ष सावित्री कवळेकर (Savitri Kavalekar) यांनी सांगे मतदारसंघात भाजप (BJP) उमेदवारीवर आपला दावा सांगितला आहे. एवढे दिवस त्यांनी या मतदारसंघात आपले काम चालू ठेवले होते पण जाहीरपणे त्यांनी कधीही उमेदवारीच्या शर्यतीत असल्याचे जाहीर केले नव्हते. पण 28 जून रोजी त्यांनी पहिल्यांदाच आपणही तिकिटाच्या शर्यतीत असल्याचे जाहीर केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Heat Wave : राज्यात उष्मा वाढला, घामोळ्याने जीव होतोय हैराण; काळजी घेण्याचे आवाहन

Mapusa News : रमाकांत खलप हे ‘बँक लुटारू’ ! मुख्‍यमंत्री

Valpoi News : पिसुर्ले पंचायत क्षेत्रात खाणी सुरू करण्याचा प्रयत्न : आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे

Panaji News : भाऊबीज समजून तुमच्या ‘भाई’ला मत द्या! ॲड. रमाकांत खलप

Margao News : रेल्‍वे मार्ग दुपदरीकरणास सुरावलीतून विरोध; बैठकीत एकमताने निर्णय

SCROLL FOR NEXT