CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: भाजप प्रवेशासाठी अनेक इच्छुक

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत: कर्नाटकातही लवकरच बदल

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant: बिहारमध्ये भाजपच्या सहभागाने आता सरकार स्थापन होत असले, तरी त्याची पूर्वतयारी बऱ्याच आधीपासून सुरू होती. आता देशभरात भाजपशिवाय अन्य पर्याय नाही हे अनेकांना कळून चुकले आहे. यासाठी भाजप प्रवेशासाठी अनेक मातब्बरही इच्छुक आहेत.

त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातही काही नेते भाजपमध्ये आले तर आश्चर्य वाटू नये, असे सूचक उद्‍गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कासारगोड येथून दै. ‘गोमन्तक’शी बोलताना काढले. केरळमधील भाजपच्या पदयात्रेची सुरवात आज सकाळी त्यांच्या हस्ते करण्यात आली. सायंकाळी ते रेल्वेमार्गे परत येण्यास निघाले, तत्पूर्वी त्यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, लोकसभा निवडणूक जवळ आल्याने राजकीय हालचाली होणे हे ठरून गेलेले आहे. काही राज्यांत बिगर भाजपचे सरकार आहे तेथील नेत्यांना भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी व्हावे असे वाटत आहे. शेजारील कर्नाटकातील अनेक बडे नेते भाजपच्या संपर्कात आहेत.

कुमारस्वामी हे धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते भाजपमध्ये मागेच आले, आता विधान परिषदेचे सदस्य जगदीश शेट्टर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आपल्या राज्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. अनेकांना भाजपसोबत यावेसे वाटते. कॉंग्रेसचे ८ आमदार मागे आले, आता त्या पक्षातील दुसरी फळी भाजपमध्ये आली तरी आश्चर्य वाटून घेऊ नये.

भाजप सर्वसमावेशक राजकारण करतो. त्यात प्रत्येकाला संधी मिळते. आमच्याच पक्षात एखादा साधा कार्यकर्ताही सर्वोच्च नेता होऊ शकतो. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून आमच्या पक्षाचे आकर्षण वाटणे साहजिक आहे.

गोव्यात काँग्रेसकडे उमेदवारांचीच वानवा

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, की दिल्ली, पंजाब, बिहार, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या विश्वासू सहकाऱ्यांनी साथ सोडणे सुरू केले आहे. गोव्यातही दोन्ही जागा लढवण्याचा आव कॉंग्रेस आणत असली तरी त्यांच्याकडे भाजपला किमान टक्कर देऊ शकेल अशा उमेदवारांचीच वानवा आहे. कॉंग्रेस हळूहळू जनाधार गमावत आहे. मतदारांचा आता कॉंग्रेसच्या नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही.

केरळमध्ये भाजप 10 जागा जिंकणार

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा केरळमधील पदयात्रेचे उद्‍घाटन करणार होते. मात्र, बिहारमधील घडामोडींमुळे त्यांना केरळचा दौरा अर्धवट टाकून दिल्लीला परतावे लागले. त्यांनी आपल्या जागी उद्‍घाटनासाठी केरळला जाण्याची विनंती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना काल दूरध्वनीवरून केली.

त्यामुळे कासारगोड येथे गेले. ते म्हणाले, माझ्यासाठी ही मोठी संधी आहे. केरळमधील कार्यकर्त्यांत मोठा उत्साह मला जाणवला. लोकसभेच्या किमान १० जागा भाजप केरळमध्ये जिंकेल. ही पदयात्रा महिनाभर चालणार असून एक दिवस एका मतदारसंघात ती चालणार आहे. आज दिवसभर पदयात्रेसोबत होतो. उद्‍घाटन सत्रात केरळमधील कार्यकर्त्यांना संबोधित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UPI Transactions Record March 2026: डिजीटल इंडियाचा नवा विक्रम! UPI व्यवहारांनी गाठला ऐतिहासिक टप्पा; मार्च महिन्यात 22.64 अब्ज ट्रान्झॅक्शनची नोंद

ना विराट, ना सचिन; युवीच ठरला हिरो! अर्जुन तेंडुलकरनं बॅटिंग आयडॉलवरुन चकवलं, युवराजच्या 'फियरलेस' शैलीचा दिवाना

एव्हरेस्टवर गिर्यारोहकांच्या जिवाशी खेळ! 167 कोटींच्या विमा घोटाळ्याचा पर्दाफाश, पर्यटकांच्या अन्नात कालवलं विष; 32 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Grah Gochar 2026: द्विद्वादश आणि अष्टादश योगाचा धमाका! शुक्र, वरुण आणि बुधाची युती; 'या' 5 राशींच्या लोकांना धनलाभाची 'सुवर्णसंधी'

LSG vs DC: स्टब्सची फटकेबाजी अन् प्रिन्सची खुन्नस! लखनऊ विरुद्ध दिल्ली सामन्यात हायहोल्टेज ड्रामा; 'हॉट टॉक'ने वेधलं लक्ष VIDEO

SCROLL FOR NEXT